भावी अधिकाऱ्यांनी आकोटात साजरा केला अनोखा तान्हा पोळा

0
643
Google search engine
Google search engine

आकोटः संतोष विणके :-

शेतकऱ्यांचं दैवत असणाऱ्या वृषभराजाचा पोळा सणापाठोपाठ बालगोपालांचा तान्हा पोळा सर्वत्र उत्साहात साजरा झाला असतांना अकोटात मात्र भावी अधिकाऱ्यांनी साजरा केलेल्या अनोखा तान्हा पोळ्याने शहर वासियांचे लक्ष वेधुन घेतले.स्थानिक केशवराज वेटाळातील कैलास वर्मा यांच्या टार्गेट अकॕडमी येथे हा अनोखा तान्हा पोळा भरवण्यात आला होता.

यावेळी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे शंभर हुन अधिक विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते,या अनोख्या तान्हा पोळ्याचे आकर्षण म्हणजे शासनाच्या विविध योजना सांगणारे देखावे तथा “बेटी पढाओ बेटी बचाओ” सारखे संदेश देणारे फलक लावून यावेळी सामाजीक संदेश देण्यात आले होते.

विशेष बाब म्हणजे या उपक्रमात सर्व मुली सहभागी झाल्या असून त्यांनी स्वतः मातीपासून नंदीबैल साकारले,यावेळी पारंपरिक पद्धतीने नंदीबैल सजवण्यात आले,

हा आगळावेगळा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती,अकोट येथे आज साजरा झालेला तान्हा पोळा उत्सव यावेळी सर्वांच्या चर्चेचा विषय बनला होता