श्री सरस्वती विद्यालयाच्या कु.अर्चना अढाऊ यांना उत्कृष्ट शिक्षक गौरव पुरस्कार

117

 

आकोटः प्रतिनिधी

स्थानिक श्री सरस्वती विद्यालयात दरवर्षी संस्थांअंतर्गत वार्षिक उत्कृष्ट शिक्षक गौरव पुरस्कार देण्यात येतो.यंदाचा पुरस्कार हा सहाय्यक शिक्षीका कु.अर्चना अढाऊ (सौ. सावरकर) यांना श्री सरस्वती शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष श्री मोहन आसरकर यांच्या हस्ते देण्यात आला. ह्यावेळी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून श्री अश्वीन सेजपाल हे होते.
संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षक व विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने हजर होते. सर्वांनी पारितोषिक प्राप्त सर्वांचे अभिनंदन केले.

शाळेतील ५ वी ते १२ वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना व समाजाची नि:स्वार्थ भावाने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने शिक्षकांना दरवर्षी हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।