गुणी बापाची गुणी पोर – वर्तमानपत्राचा वापर करून तयार केली बैलगाडी

85
चांदूर रेल्वे – (शहजाद खान)
     चांदूर रेल्वे शहकातील जिंगल बेल इंग्लिश स्कुलची विद्यार्थिनी सुहानी विनोद भोयर हिने टाकावू वस्तु पासून टिकावू वस्तू तयार करण्याचा छंद जोपासला आहे. तान्हा पोळ्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करून बैलजोडीची प्रतिकृती साकारली आहे.
       सुहानी भोयर हिला वर्तमानपत्र वाचनाची आवड आहे. घरी येणाऱ्या वर्तमानपत्र या पासून हि कोणालाही आवडेल अशी बैल जोडी, बैल गाडी तयार केली. कागदा पासून तिने बऱ्याच वस्तु तयार केल्यात तिचे सगळीकडे कौतुक होत आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षक विनोद भोयर यांची मुलगी आहे. वडील सुद्धा त्यांच्या क्षेत्रात नाविन्य पूर्ण करत राहतात. क्युलींग पेपर व वर्तमानपत्राला गोल गोल गुंडाळून त्यास बैलाच्या तोंडाचा आकार दिला. त्याच प्रमाणे पोटाचा आकार दिला पेपर गोल करून त्यास थोडे ढिले सोडून प्रेस करून कानाचा आकार दिला. शिंगे सुद्धा पेपर गोल करून मागून पुढे ढकलण्यात आली. वर्तमानपत्र घेवून त्याचे गोल पाईप करुन एकावर एक असे फेव्हिकॉल ने लावण्यात आले नंतर त्यास कलर करून सजविण्यात आले. कोणताही खर्च न करता ही बैलगाडी तयार केली.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।