*गेल्या पाच वर्षातील विकासकामांचा आढावा कार्यकर्त्यांनो जनतेच्या घरापर्यंत पोहोचवा :-पालकमंत्री डॉ अनिल बोंडे*

107

*अमरावती:-*

गेल्या पाच वर्षात मोर्शी वरुड विधानसभा मतदार संघात साडेसहा हजार कोटी रुपयांची कामे धडाडीने सुरु असून एवढी विकास कामे बघुन विरोधकांनाही धडकी भरली असून यामुळे सर्व विरोधक एकत्र येत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी सजग राहावे. पाच वर्षांतील विकासाचा आराखडा मोर्शी वरुड मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहचविला पाहिजे, असे आवाहन पालकमंत्री व त्या मतदारसंघाचे आमदार डॉ अनिल बोंडे यांनी बूथ कमेटी च्या मेळाव्यात कार्यकर्तांना केले.

वरूड येथे आयोजित भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष, वरुड, मोर्शी नगराध्यक्ष, वरुड मोर्शी मतदार संघातील कार्यकर्ते उपस्थित होते.

शासनाच्या योजना व विकासकामे घराघरापर्यंत पोहचवा, असे आवाहन डॉ. बोंडे यांनी केले.
डॉ अनिल बोंडे हे राज्यातील पहिल्या दहा उत्कृष्ट आमदारापैकी एक आहेत. त्यांची शेतकऱ्यांबद्दल तळमळ पाहून मा. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कृषिमंत्री पदाची जबाबदारी दिली
राज्याच्या कृषिमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले, असे ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.

डॉ अनिल बोंडे यांच्या झंझावाती विकास कामामुळे मोर्शी वरुड तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश घेतला.
भाजपचे जिल्हाध्यक्ष
दिनेश सूर्यवंशी,वरुडचे नगराध्यक्ष सौ. स्वाती आंडे, मोर्शीचे नगराध्यक्ष अप्पासाहेब गेडाम, राजकुमार राऊत, राजेंद्र सुपले, निलेश अढव , विजय श्रीराव, युवराज आङे, जि प सदस्य संजय घुलक्षे, अनिल डांबरासे, सारंग खोडस्कर, शरद मोहोड, अजय आगरकर, निलेश चौधरी, अंजली तुमराम, ललिता लांडगे, आसिफ खान पठाण, रुपेश मांडवे नगराध्यक्ष शे. घाट, सर्व भाजप चे नगरसेवक, पदाधिकारी , यांच्यासह
शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।