रत्नापुरमध्ये दारूबंदीसाठी जमली असंख्य महिला मंडळी

0
938

खालिद पठान सिंदेवाही

तालुका प्रतिनिधि:- चंद्रपुर जिल्ह्यात दारू बंदी लागु झाली मात्र आजही मोठ्या प्रमाणात दारू चंद्रपुर जिल्ह्यात सुरु आहे. त्यासाठी अनेक गावातील महिला एकत्रित होऊन दारूबंदीसाठी पुढाकार घेताना आढळुन येत आहेत. सिंदेवाही तालुक्यातील नवरगावमध्ये एका वर्षाच्याआधी दारूचा साठा मोठ्याप्रमाणात प्राप्त व्हायचा मात्र जेव्हापासुन सामाजिक युवा ब्रिगेड संघठना निर्माण झाली तेव्हापासुन दारुचा महापुरचा प्रमाण नाहीच्या बराबर झाला त्यामुळे आता दारू पिनारे शौकिन आपला मोर्चा नवरगावला लागून असलेल्या रत्नापुर, नैनपुरकड़े वडविलेला आहे. त्यामुळे रत्नापुरमधील बहुसंख्य महिला मंडळी यांनी आज एक मोठ्या सभेचा आयोजन करुन दारुबंदी विषयावर्ती मार्गदर्शन व दारूबंदी महिलांची वार्ड वाहिज समिति बनविण्यात आली. या सभेचे अध्यक्ष सिंदेवाही पोलिस स्टेशनचे ठानेदार निशिकांत रामटेके, प्रमुख पाहुणे पोलिस उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर, सामाजिक ब्रिगेड संघठनेचे प्रमुख अमोल निनावे, जिल्हा उपाध्यक्ष कल्पना बोरकर, पोलिस पाटिल नरेंद्र गहाने तसेच अनेक मान्यवर व मोठ्या प्रमाणात रत्नापुरच्या महिला मंडळी उपस्थित होत्या.
या सभेमध्ये सर्वानुमते रत्नापुर गावची दारू बंद झाली पाहिजे असे अनेक महिलांच्या मुखातून निघत होते. अनेक लोकांचा संसार या दारूमुळे बुडाला असे अनेक समश्यानवर्तीचे विचार मंथन झाले.