दोन महिन्यातच सिमेंट कॉक्रीटीकरण च्या रोडवर पडल्या भेगा. राजकिय वातावरणात अनोखी चर्चा

0
982
Google search engine
Google search engine

दोन महिन्यातच सिमेंट कॉक्रीटीकरण च्या रोडवर पडल्या भेगा.

राजकिय वातावरणात अनोखी चर्चा.

अमरावती प्रतिनिधी:-

प्रहार पक्षाचे आमदार यांच्या मतदार संघातील सिमेंट रस्ता दोन महिन्यांच्या कालावधी मध्ये झाला क्रॅक.
मतदार संघातील रिद्धपुर ते चांदुर बाजार नव्याने झालेल्या सिमेंट कॉक्रीटीकरण च्या रोड वर कंपनीचा कामप्रति असलेल्या निकृष्ट पणा उघड्यावर आला आहे.त्यामुळे राज्याच्या अनेक अधिकारी यांच्या भ्रष्टाचार प्रती आक्रमक असणारे आमदार बच्चू कडू यांच्या मतदार संघातच जर अश्याप्रकारे कार्यभार सूरु असल्याने या मुळे अनेक राजकीय चर्चांना मतदार संघात उधाण आले आहे.

HG इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी ला हे काम देण्यात आले.जर दोन महिन्यात याला भेगा पडल्याने याचा कार्यकाळ पर्यत ते टिकतील कसे.रोड च्या देखरेख कंपनीला आहे. मात्र ही कंपनी रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तर करीत नाही असे रोड वरील पडलेल्या भेगा वरून दिसून येते.