*बाप्पा,शासनाला बुद्धी देऊन, सर्वांनाच जुनी पेंशन योजना लागु कर:- श्री शेखर भोयर यांचे गणरायाला साकडे*

0
503
Google search engine
Google search engine

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔹
अमरावती:-
वेड लागलेल्या शासनाला बुद्धी देऊन 2005 पुर्वीच्या तसेच नंतरच्या राज्यातील सर्वच कर्मचा-यांना जुनी पेंशन योजना लागु करण्याची सदबुद्धी दे व सर्वांचे कल्याण कर अशी कामना शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांनी मंगलमुर्ती बाप्पाच्या चरणी केली.
अवघ्या जगाचा पालनकर्ता, प्रत्येक शुभकार्याचा देव भगवान श्रीगणेश यांना आपल्या घरी विराजमान (स्थापना) करण्याकरिता मोठ्या थाटामाटात आणले.यावेळी त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा हार्दिक, त्यांचे सोबती असणारे दोन वाहक चालक उपस्थीत होते. संपुर्ण राज्यभरात नव्हे तर देशभरातच आज बाप्पाची मोठ्या धामधुमीत स्थापना होत आहे.
शिक्षक हा समाज घडवीता असुन तो दु:खी असल्यास (भविष्याची शिदोरी जुनी पेन्शन नसल्यास) समाजाचा तसेच देशाचा विकास होऊ शकणार नाही म्हणून GR ने झपाटलेल्या शासनाला GPF चे विधेयक सुद्धा सभागृहात सादर करुन पारित करण्याची सद्बुद्धी देण्याची मागणी शेखर भोयर यांनी गणराया चरणी नतमस्तक होऊन केली.