महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, तालुका शाखा सिंदेवाही चे असहकार आंदोलन सुरू

0
449

तालुका प्रतिनिधि – सिंदेवाही
खालिद पठान
***********’
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन चे निर्देशानुसार सिंदेवाही तालुक्यातिल ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी असहकार आंदोलन पुकारले असुन त्याची झळ सामान्य माणसाला सहन करावी लागत आहे. ग्रामपंचायतीकडून अनेक महत्त्वाचे लागणारे दाखले ग्रामसेवक यांचे असहकार आंदोलन सुरू असल्याने मिळत नसून ग्रामस्थांचे कामे अडून राहिलेली आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कामासाठी, शेतकर्‍यांच्या शेतीविषयक शासकीय कामासाठी ग्रामसेवक यांचा दाखला आवश्यक आहे. आपल्या प्रलंबित मागण्या मंजूर व्हाव्या यासाठी राज्यातील २२,००० हजार ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यानी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन चे निर्देशानुसार असहकार, कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून, ९ अॉगस्ट २०१९ या क्रांतीदिनी मोर्चाचे आयोजन करून प्रलंबित मागण्यांसाठी गटविकास अधिकारी यांचे मार्फतीने शासनापर्यंत निवेदन पाठविले आहे. शासनस्तरावर ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी संवर्गाची ५ वा वेतन आयोगाच्या त्रुटी अजूनही दुर झाल्या नसल्याने, व इतरही न्याय मागण्या मंजूर झाल्या नसल्याने राज्यभर या विरोधात लोकशाही व सनदसिर मार्गाने असहकार आंदोलन करन्यात येत आहे. करीता आदरणीय महोदय सदर राज्य युनियन ने घेतलेल्या निर्णयाला चंद्रपुर जिल्हा बांधील असून, सदर असहकार आंदोलनांमध्ये संदर्भीय पत्राचे अनुषंगाने टप्प्या, टप्प्यात होणार्‍या आंदोलनात चंद्रपुर
जिल्हा युनियन चे सर्व सदस्य सहभागी आहेत. याबाबत लेखी पत्राद्वारे संवर्ग विकास अधिकारी, सिंदेवाही यांना कळविले आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन उपाध्यक्ष – कुमारी मिनाक्षी बंसोड यांनी कळविले आहे.