सिंदेवाही शहरातील रस्त्यावरील पाणी व खड्डे वाहतुकीस ठरतेय त्रासदायक

0
548
Google search engine
Google search engine

दुर्लक्षित शहर !! पाणीमय शहर!! पाणी फेका !! खड्डे बुजवा !!

खालिद पठान

तालुका प्रतिनिधि सिंदेवाही: शहरातील राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक आणि अती पावसामुळे भरपूर प्रमाणात रस्त्याला खड्डे पडले आहेत. सिंदेवाही शहराची चंद्रपूर मार्गावरील होणारी सुरवात महालक्ष्मी मंदिर रोड, स्मशानभूमी चे पुलावरील खड्या पासून होते तर शहराचे शिवाजी चौक बस्थानक ते नागपूर मार्गावरील नागराज राईस मिल पर्यंत खड्डेमय वातावरनात महामार्गावर प्रत्येक वाहनाला कसरत करावी लागत आहे. सिंदेवाही शहरातील बाजार , राष्टीय बँक, शाळा , कॉन्व्हेंट , व्यवसाय हॉस्पिटल , मेडिकल, हॉटेल्स सर्वांचे ठिकाणी जाणे आणि येणारी सर्व वाहने खड्यातून करावी लागत आहेत.भरपूर पाऊस झाला की शिवाजी चौक कॉर्नर पाण्यानी व्यापलेला असतो. खड्यांमध्ये काही ठिकाणी मुरूम आणि सिमेंट चे ठिगळं लावले गेले परंतु अति पावसामुळे रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे.
आज (4) झालेल्या पावसामुळे सिंदेवाही शहरातील मुख्य मार्ग चंद्रपुर नागपुर मार्ग हा चक्क पाणीमय झालेला दिसून आला हा प्रकार पहिलेवेळ नसून याआधी पन यामार्गावर पावसाचे पाणी साचुन अक्का मार्गच बंद होतो पण हा प्रकार प्रशासनाला दिसतो की नाही हा एक मोठा प्रश्न सिंदेवाही वासिंना होत आहे. याच मार्गावर दुकाने, कंप्यूटर प्रशिक्षण संस्था, कॉन्वेंट लागुनच आहे पन मुख्य मार्गावर पाणी साचला की सर्वाना ये-जा करण्याकरिता एक मोठी कसरत करावी लागते.
पाणी अडवा पाणी जिरवा !! पाणी भरपूर झाला आहे परंतु जिरतचं नाही. शहरातील कार्यक्रम कुठे असला की पाहुणे एखादे राजकीय मंत्री येणार असले की महामार्गावर आणि कार्यक्रम स्थळी पर्यंत सिंदेवाही शहरा तील खड्डे, आणि चक्क डांबर टाकून डांबर मशीन, रोड रोलर चा वापर करून बुजविले जातात .. खड्डे बुजवा !! ही मागणी सर्व सिंदेवाही वासियांना करावी लागणार तर नाही ना !