आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी केली संरक्षण भिंत बांधकाम साठी मदत

0
496
Google search engine
Google search engine

चिमुर तालुक्यातील कोटगाव येथील गुरुदेव सेवा मंडळचे बांधकाम अपुरे असल्याने पदाधिकाऱ्यांनी संरक्षण भिंत बांधकाम करण्यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचेकडे अर्ज करून सहकार्य करण्याची मागणी केली असता तात्काळ शब्द देऊन दुसऱ्याच दिवशी 51 हजार रुपयांची आर्थिक सहकार्य करण्याचे शब्द पाळत भाजप पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केले आहे
कोटगाव येथील सिमेंट क्रांकीट रस्ता भूमिपूजन केले असता दरम्यान गुरुदेव सेवा मंडळ च्या सेवकांनी संरक्षण भिंत बांधकाम करायचे असल्याबाबत अर्ज दिला
तेव्हा आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी 51 हजार रुपयांची आर्थिक सहकार्य केले तसेच गुरुदेव महिला दंडार महिला मंडळास सुद्धा आर्थिक मदत केली

यावेळी भाजप तालुका महामंत्री विनोद अढाल ,शंकरपूर जीप क्षेत्र प्रमुख अवि बारोकर शक्तिकेंद्र प्रमुख अनिल शेंडे भाजप चिमूर शहर अध्यक्ष सचिन फरकाडे शहर महामंत्री सुरज नरुले वासुदेवजी श्रीरामे सर,अजय शीरभैय्ये शक्तिकेंद्र प्रमुख रामेश्वर सावसाकडे बूथ अध्यक्ष सुरेश मुंडरे गुरुदेव सेवा मंडळ चे रामचंद्र धारने श्रीराम कापसे खेमराज कापसे व दंडार महिला मंडळाच्या सौ रामकला धारने, सौ वछला मुंडरे, सौ कमल चौधरी,सौ अंजना धारने आदी उपस्थित होते.