नाल्याच्या वाहत्या पाण्यात पडुन महिलेचा मृतु

0
649
Google search engine
Google search engine

सिंदेवाही- तालुक्यातील मेंढा माल येथिल सरिता ईश्वर परचाके वय 55 वर्ष व पती ईश्वर परचाके हे दोघेही दिव्या दीपक खोब्रागडे यांच्या शेतात रोहना करण्यासाठी गेले होते. दोघेही शेतामधून परत येत असताना शेताच्या नाल्यावरील टाकलेल्या बांधावरुन जात असताना सरिता ईश्वर परचाके वय 55 वर्ष यांचा पाय घसरला व त्या वाहत्या पाण्यात पडल्या, पाण्याचा प्रवाह खूप वेगाने असल्यामुळे त्या प्रवाहासोबत वाहून गेल्या सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन सिंदेवाहीला देण्यात आली माहिती मिळतास पोलिस निरीक्षक निशिकांत रामटेके यांनी दोन अधिकारी व पाच कर्मचारी घटनास्थळी रवाना केले.

घटना दिनांक 04 सप्टें 2019 दुपारी अंदाज़े 12 वाजताची आहे या घटनेत मय्यत महिला सरिता ईश्वर परचाके वय 55 चा मृतदेह नाल्यापासुन काही अंतरावर एका शेतामध्ये आढळला वाहत्या पाण्याच्या प्रवाहमुळे सदर महिलेचा मृतु झाला. पुढील तापास सिंदेवाही पोलिस करित आहे.