श्रीवास परिवाराचा पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याबाबत देखावा

0
784

श्रीवास परिवाराचा पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याबाबत देखावा

अकोलाः प्रतिनिधी
आकोट ग्रामीण पोलिस स्टेशनला कार्यरत पोलीस अंमलदार महेश श्रीवास यांच्या परिवाराचा घरगुती गणेशोत्सोवात दर वर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा वेगळा उपक्रम राबवत पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्याबाबतचा देखावा साकारला आहे,श्रीवास परिवार गणेश मंडळ, श्रध्दा रेसिडेन्सी, देवीखादन, मातोश्री A-११, अकोला. येथे जनतेमध्ये समाजप्रबोधन व जनजागृती व देशसेवा व्हावी या उद्देशाने कुस्तीपटू स्व. सरजुप्रसादजी श्रीवास, मुर्तीजापुर. यांचे स्मृती प्रित्यार्त आम जनते कडून महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे येथे आलेल्या महापुरात बळी पडलेल्या लोकांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने श्रीवास परिवाराने गणेश उत्सव दरम्यान पहाडातून पाणी येऊन गावात शिरल्याने गावातील लोकांचे घरे, गुरेढोरे, जनतेच्या जीवित व आर्थिक मालाचे नुकसान झाल्याने त्यांना उघड्यावर, उपाशी राहण्याचे मोठे संकट येऊन पडले आहे.
पूरग्रस्त लोकांचे धेर्य मनोबल न खचून देण्यासाठी मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडवणीस (महाराष्ट्र शासन) यांनी देशातील आर्मी व पोलिस प्रशासनाने आपल्या जीवाची परवा न करता पूरग्रस्त लोकांचे प्राण वाचविले व त्यांना आर्थिक मदत केळी आहे. आपण आपल्या शक्तीनुसार मा. मुख्यमंत्री पूरग्रस्त सहाय्य निधी SBI खाते क्रमांक A/C : 10972433751 IFSC : SBIN0000300 (Main Branch Mumbai.) वर मदत करावी.
पहाडातून पाणी येऊन पूर परिस्थितीचा हृदयस्पर्शी देखावा आणि पाण्यामुळे घरे कोसळत आहे. व प्रशासन मदत कार्यात लागली आहे. असा देखावा व टी.व्ही. वर महापूर आल्यास जनतेने काय करावे असा संभाषनिय देखावा केला आहे.
जनतेनी पूरग्रस्तांना मदत करावे या करिता मा. मुख्यमंत्री यांचे बेंक खाते क्रमांक व उपयुक्त माहिती टी.व्ही. वर देखावा माणून दाखवण्यात येत आहे.
जनजागृती व पूरग्रस्तांना आर्थिक मदत एक अभियान म्हणून लोकांपर्यंत संदेश देणारा असा सुंदर देखावा श्रीवास परिवार गणेश मंडळ तर्फे मयूर, अक्षय, शुभम, सौ. अनिता महेश श्रीवास परिवार यांनी केला आहे.