संस्थाचालकाकडून शिक्षकांना मारहाण ; उस्मानाबादेत शिक्षकांचे अमरण उपोषण सुरु

142
जाहिरात
Slider

उस्मानाबाद /प्रतिनिधी
शिक्षक दिनीच शिक्षकांवर अमर उपोषण करण्याची वेळ
राज्यात सर्वत्र शिक्षक दिनी आज शिक्षकांचा सन्मान होत असताना केवळ संस्थाचालकाची मग्रुरी व अधिकार्यांच्या दफ्तर दिरंगाईमुळे उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील श्री शरदचंद्रजी पवार प्राथमिक विद्यालयाच्या शिक्षक बंधु भगिनीवर अमरण उपोषण करण्याची वेळ आलीय
उमरगा तालुक्यातील नाईचाकूर येथील श्री शरदचंद्रजी पवार विद्यालयात संस्थाचालकाची मनमानी सुरु असुन शाळेत शाळेत भौवतीक सुविधांचा अभाव व विकासात्मक निधींची आफरातफर आहे. या प्रकरणी शाळेच्या शिक्षकांनी वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरुन संस्थाचालक शिक्षकांसोबत अरेरावी व मग्रुरपणे वागत आहेत.संस्थेवरील पाच पुरुष शिक्षकापैकी दोन ते तिन पुरुष शिक्षकांना वेगवेगळ्या गुंडामार्फत मारहाण केली असुन या प्रकरणी संबंधीत शिक्षकांनी विवीध पोलिस ठाण्यात तक्रारी दिल्या आहेत तसेच महिला शिक्षिकेंची देखील कुचंबना होत आसुन संस्थाचालक त्यांच्यांशी देखील लज्जास्पद भाषा वापरुन आरेरावी करत आहे. गेल्या चार ते पाच महिन्यापासुनचे वेतन अदा केलेले नाही.शाळेतील आफरातफर प्रकरणी मुख्याद्यापकास निलंबीत करण्यात आले आसुन आतापर्यत प्राथमिक शिक्षणाधीकार्यांनी मुख्याद्यापक पदाचा पदभार रिक्त ठेवला आहे यामुळे कर्मचार्यासोबत विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे
प्रथमिक शिक्षण अधिकार्यांनी निलंबीत केलेल्या मुख्याद्यापकाची नियुक्ती तात्काळ करावी .व थकीत वेतन आदा करावे यासाठी आज शिक्षकांनी उपोषण सुरु केले आहे. कर्मचार्यावर उपासमारीची वेळ आली आहे म्हणुन संबंधीत शाळेच्या शिक्षकांनी आज आपल्या विविध मागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असून या उपोषणाला मराठावडा शिक्षक संघाने पाठिंबा दिलाय

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।