सुरेश पाटिल शांतलवार कनिष्ठ महाविद्यालय पळसगाव (जाट) येथे शिक्षक दिन साजरा

0
1036
सिंदेवाही- ओम साई बहुउद्देश्यीय शिक्षण संस्था, तिर्री द्वारा संचालित सुरेश पाटिल शांतलवार कनिष्ठ महाविद्यालय पळसगाव (जाट) येथे 5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस  शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला.  त्यानिमित्त महाविद्यालयामध्ये हा दिवस स्वयंशासन म्हणून महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना शिक्षक बनवून  साजरा करण्यात आला.
प्राचार्य म्हणुन हर्षद शेंडे, शिक्षक म्हणुन चैताली माटे, निशा शेंडे, फराह शेख, आचल बनकर, अंकुश बनकर, तुषार मडावी, आचल मेश्राम, विजय लंजेकर तर शिपाई म्हणुन गायत्री मेश्राम यांनी जबाबदारी पार पाडली.
यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याबरोबरच शिक्षकाची जबाबदारी काय आहे यातून विद्यार्थ्यांना प्रत्ययास आणून दिली जाते.
कार्यक्रमाचे संचालन नयना उइके  केले, प्रास्ताविक प्रा. जागेश बोरकर यांनी केले तर श्रेया उदासी यांनी केले.