गोदारत्न पुरस्कारासाठी अशोक मुंडगावकर यांची निवड

0
753
Google search engine
Google search engine

गोदारत्न पुरस्कारासाठी अशोक मुंडगावकर यांची निवड

अकोटः प्रतिनिधी

शहरातील प्रतिष्ठित नागरिक , श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य व आकोट सराफ – सुवर्णकार संघाचे माजी अध्यक्ष अशोकदादा मुंडगावकर यांची राज्यस्तरीय गोदारत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.नाशिक परीसर वृत्तपत्र लेखक संघाद्वारा गोदारत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली असुन.या पुरस्कारासाठी निवड झाल्याचे पत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.गेल्या ३० वर्षापासुन नाशिक येथे गोदारत्न पुरस्काराचे दरवर्षी आयोजन करण्यात येत आहे.यंदा महाराष्ट्रातील आठ जणांना राज्यस्तरीय गोदारत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.पुरस्कार वितरण सोहळा हा ८ सप्टेंबर ला नाशिक येथे मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.अशोकदादा मुंडगावकर यांनी सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक , अध्यात्म आदी विविध क्षेत्रात केलेल्या भरीव कामगीरीसाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे आयोजकांनी निवडपत्रातुन कळवले आहे.अशोकदादा मुंडगावकर हे राष्ट्रसंताच्या विचारांचा जागर करणारे गुरुदेवभक्त म्हणुन जिल्ह्यास परीचित आहेत.त्यांना मिळालेल्या या सन्मानाने अकोट वासियांचा महाराष्ट्र स्तरावर होणाऱ्या गौरवासाठी त्यांच्यावर विविध स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.