अमरावती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सदस्यांनी शिरखेड जवळ बस मध्ये अडकलेल्या १९ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले

0
1068
Google search engine
Google search engine

अमरावती :- शिरखेडजवळ अडकलेल्या बस व १९ प्रवाशांना अमरावती जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाच्या १७ सदस्यांच्या पथकाने सुखरूप बाहेर काढले.

मुकुंद देशमुख (मौजा शिरखेड तालुका मोर्शी) यांनी शिरखेड रोडवर नाल्यात एक बस अडकल्याची माहिती रात्री ८ च्या सुमारास कक्षाला दिली. या बस मध्ये अंदाजे २० व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे बचावासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा शोध व बचाव पथक साहित्यासह 17 सदस्य तत्काळ रवाना करण्यात आले.
दरम्यान, गाडीतील प्रवाशी यां च्याशी अधिकारी व कर्मचारी सतत संपर्कात होते .गावातील नागरिक यांचे मदतीने त्यांना पाणी ,बिस्कीट v अन्य पदार्थ पुरविले गेले. पथक पोहोचतच मदतकार्य सुरू झाले. काही वेळेतच सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

पथकात आपत्ती कक्षाचे सुरेंद्र रामेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश बोरोकर, गुलाब पाटणकर, विजय धुर्वे, हिरालाल पटेल, प्रविण आखरे, कैलास ढाकरे, देवानंद भुजाडे, हेमंत सरकटे, संदीप देवकते, उदय मोरे, महेश मांदाळे, प्रफुल्ल भुसारी, अजय आसोले, कौस्तुभ वैद्य, अमोल हिवराळे,राजेंद्र शहाकार, दीपक डोरस
वसीम पठाण (चालक),
उदय गौर (चालक) सा बा आदी कर्मचारी होते.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस असून,
जिल्हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे v आपत्ती नियंत्रण कक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.