अकोला जिल्हा शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत अकोटच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

0
642

अकोला जिल्हा शालेय सॉफ्टबॉल स्पर्धेत अकोटच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

अकोटः ता.प्रतिनिधी

स्व. वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे संपन्न झालेल्या जिल्हा स्तरिय शालेय सॉफ्टबॉल स्पर्धामध्येअकोटच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.यात मुलांच्या विभागात 14 वर्षे, 17 वर्षे व 19 वर्षे वयोगटातील स्पर्धेत चमकदार कामगिरी करून अपराजित राहत देशपांडे अकॅडमी अकोटच्या खेळाडूंनी आप आपल्या शाळेसाठी विजेतेपद पटकाविले.
14 वर्षे वयोगटातील मुलांच्या स्पर्धेत आकोट तालुक्यातुन प्रथम स्थान पटकावलेल्या आस्की किड्स पब्लिक स्कूल, आकोट च्या संघाने अंतिम सामन्यात एकतर्फी विजय नोंदवित जिल्हा विजयी होण्याचा मान लगातार दुसर्या वर्षी पुन्हा मिळवला. या संघात विराज इंगळे हा पिचर तर परिमल धर्मे हा कॅचर म्हणून चमकला. त्या सोबतच परिमल चौखंडे , अभिषेक आंधळे, श्रेयश देशमुख , श्रेयश ओइम्बे , अनमोल गणगणे आदी संघ सदस्याचे योगदान मोलाचे ठरले.
17 वर्ष वयोगटातील स्पर्धेतही आस्की किड्स पब्लिक स्कूल आकोट च्या मुलांच्या संघाने अगदी सहजरीत्या विजयश्री खेचून आणली. या संघात राष्ट्रीय खेळाडू तेजस मोडोकार, रितेश पवार , पार्थ झाडे , आयुष झाडे ,आलोक सराफी या खेळाडूंनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
19 वर्षे मुलांची स्पर्धा ही आकोट च्या श्री भाऊसाहेब पोटे विद्यालयाच्या संघाने जिंकली. या विजेत्या संघात तेजस नंदवंशी पीचर – कर्णधार याने सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करुन आपल्या संघाला जिल्ह्यात प्रथम स्थान मिळवुन दिले.

या तिन्ही चमू या महिन्यात लवकरच यवतमाळ येथे होणाऱ्या शालेय विभागिय सॉफ्टबॉल स्पर्धा 2019 मधे आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करुन राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्याचा प्रयत्न करणार आहेत.

या तिन्ही संघांना देशपांडे अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स आकोट चे सॉफ्टबॉल प्रशिक्षक श्री सुजय कल्पेकर, श्री विकास वानखडे, श्री यश निर्वाण व श्री अनुराग सुरत्ने यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

जिल्हा विजयी खेळाडूंच्या या यशा बद्दल देशपांडे अकॅडमी ऑफ स्पोर्ट्स आकोट च्या संचालिका श्रीमती मंजिरी देशपांडे व सौ. नुपुर देशपांडे यांनी खेळाडूंचे त्यांच्या पालकांचे, शाळा मुख्याध्यापक तसेच संस्था चालक व समर्थकांचे अभिनंदन केले आहे व खेळाडूंना पुढील स्पर्धेत विजयी कामगिरी साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या