पणज येथे महालक्ष्मी यात्रा महोत्सव संपन्न

0
455
Google search engine
Google search engine

पणज येथे महालक्ष्मी यात्रा महोत्सव संपन्न

आकोटः ता.प्रतिनीधी

जेष्ठ गौरी पूजनानिमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा अकोट तालुक्यातील ग्राम पणज येथील श्री महालक्ष्मी माता मंदिरात ५ व ६ सप्टेंबर रोजी यात्रा संपन्न झाली.

बोर्डी नदीच्या काठावर पुरातन व जागृत म्हणून पणजच्या श्री महालक्ष्मी माता मंदिराची ख्याती आहे. मंदिराच्या बाजूला एक पुरातन दीपमाळ व त्या बाजूला पुरातन पायविहिर अद्यापही अस्तित्वात आहे. महालक्ष्मी मातेचे माहेर अडीच दिवसाचे असून, या अडीच दिवसामध्ये गणेशाच्या आगमना बरोबरच महालक्ष्मी माता मंदिरावर भव्य यात्रा महोत्सव असतो. पनज हे गाव महालक्ष्मी मातेचे माहेर असल्याची आख्यायिका आहे. यात्रा महोत्सव व नवरात्रात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून हजारोंच्या च्या संख्येने भाविकभक्त दरवर्षी येथे दर्शनासाठी येतात. यात्रा महोत्सव दरम्यान महालक्ष्मी माता मंदिरात भजन, पूजन, सत्संग, कीर्तन, होमहवन व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ५ सप्टेंबर ला गौरी स्थापना, ६ सप्टेंबर ला मुख्य यात्रा व महाप्रसाद संपन्न झाला तर, ७ सप्टेंबर ला गौरी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. दरवर्षी या यात्रामहोत्सवात भाविकांची संख्या वाढत असल्याने आयोजक व ग्रामस्थानी भाविकभक्तांच्या सोयीसाठी चोख व्यवस्था केली आहे. या यात्रा महोत्सवात भविकभक्तांनी हजारोच्या संखेने सहभागी होत दर्शन व महाप्रसादासाठी रांगा लावल्या होत्या.