आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बेनिराम ब्राम्हणकर यांची निवड

0
512

तालुका प्रतिनिधि सिंदेवाही :- तालुक्यातील पेटगाव येथील शिक्षक बेनिराम ब्राम्हणकर याची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा 2019-20 या वर्षातला जिल्हा आदर्श पुरस्कार जिल्हय़ातील 15 शिक्षकांची निवड करण्यात आली. शिक्षण सेवेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी सिंदेवाही तालुक्यातील पेटगाव येथील शिक्षक बेनिराम ब्राम्हणकर यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात येणार आहे. त्याबद्दल सिंदेवाही पंचायत समितीचे सभापती मधुकर मडावी व संवर्ग विकास अधिकारी अशोक इल्लूरकर तसेच गटशिक्षणधिकारी संजय पालवे यांनी उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला बद्दल अभिनंदन केले आहे.