काँग्रेस पक्षाच्या आक्रोश मोर्चाला जनतेने फिरवली पाठ…

0
655

कॉंग्रेस पक्षाला जनतेचा अत्यल्प प्रतिसाद….!
चार पक्षांचा मिळून एक दिवस शेतकऱ्यांसाठी जन आक्रोश मोर्चाला लोकांचा अत्यल्प प्रतिसाद

जळगांव जामोद:- या जन आक्रोश मोर्चा करता गुजरात येथून आलेल्या हार्दिक पटेल च्या मते, एकशे चाळीस वर्षे जुनी काँग्रेस ,जिने 55 ते 60 वर्ष देशावर राज्य केलं ,ती अजूनही आपलं स्वप्न पूर्ण करू शकली नाही हे वक्तव्य केले, येथे हा प्रश्न पडतो की जनतेने अजून किती वर्ष काँग्रेसला दयावी?… कि त्यांचे स्वप्न पूर्ण होईल,
आमदार संजय कुटे यांना दिलेलं मंत्रीपद हे समाज आकर्षण असून, त्यांनी या भागाचा काहीच विकास केलेला नाही, असे अकोला राष्ट्रवादी चे अमोल मिटकरी बोलले खरे, पण ते हे विसरले की याआधी पंधरा वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती, म्हणजे मग काय काँग्रेस-राष्ट्रवादीने विकास केला नाही, की करू दिला नाही, हा विचार आता करावा लागणार, सभा काँग्रेस-राष्ट्रवादीची, पण भाषणात भाजप नेत्यांची नावे, म्हणजेच नितीन गडकरी काय बोलले, आणि नरेंद्र मोदींच्या भाषणांची नक्कलच जास्त दिसत होती तर रामदास आठवले हे तर अलगच नेते आहेत अस म्हणुन आर ,पी,आय पक्षाचा हसा देखील केला ,
पण ज्या 370 कलम रद्द साठी दिल्ली ते गल्ली पर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते विरोध करत फिरत आहेत, त्या 370 कलम रद्द ला या मोर्चात गुजरात येथून आलेल्या हार्दिक पटेलांनी समर्थन केलं,आणी गुजराती व्यापाऱ्यांन सोबत व्यापार करु नका ते तुम्हाला बरबाद करुन टाकतिल असा टोला लगावला खरे, पण हे विसरले कि ते सुध्दा गुजराती आहेत,आणी अश्या बोलण्यातुन त्यांनी व्यापाऱ्यांची मणे देखील दुखावली हे ही खरे , शिवाय शेतकऱ्यांचे हित जोपासणारे स्वाभिमानीचे रविकांत तुपकर व गोंदिया चे माजी खासदार नाना पटोले यांनी या एक दिवस शेतकऱ्यांसाठी अशा आक्रोश मोर्चाला पाठ दाखवली, तर जिल्ह्यातील चार पक्ष एकत्र मिळूनही एक हजाराच्या वर समर्थक या सभेला जुळवु शकले नाही, खुर्च्या रिकाम्या होत्या तर मंचावरुन नारे देत असतांना खाली असलेले कार्यकर्ते प्रतिसाद देत नव्हते हे ही दिसत होते . तर जळगाव जामोद मतदार संघातून कोणाला उमेदवारी मिळेल यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,स्वाभिमानी शेतकरी पक्ष, यांची या स्टेजवर ओढतान दिसून आली.