आईसह चार वर्षीय मुलाची निघृन हत्या- बत्याने ठेचले, कारण अनभिज्ञ –  नरखेड येथील घटना !

7526
जाहिरात

 

मनोज खुटाटे :-

नरखेड येथील स्वामी विवेकानंद चौकाजवळील नारायण वानखेडे यांचे घरी भाड्याने राहणाऱ्या साहू कुटुंबातील आई व चार वर्षीय बालकाची बत्याने ठेचून निघृन हत्या करण्यात आली़ आज सायंकाळी सात च्या सुमारास घरी गणपती असुनही अंधार असल्यामुळे बघावयास गेलेल्या शेजाऱ्यामुळे हा प्रकार उघडकीस आला़. नरखेड येथील स्वामी चौकाजवळील भोंडेखारी वार्ड क्रमांक आठ येथे नारायण वानखेडे या सेवानिवृताचे घर आह. ते सध्या नागपूर येथे वास्तव्यास आह. त्यांनी समोसे, पाणीपुरी विकणाऱ्या बहारी राज्यातील लोकांना घराचा तळमजला भाड्यांने दिला आहे. जवळपास आठ महिन्यापूर्वी दिनेश सियाराम साहू रा़ दरीयापूर जि.पुतेहपूर बिहार हा आपल्या पत्नी व तीन चार वर्षीय बालकासह वानखेडे यांचेकडे राहावयास आला़ आठवडी बाजारोबाजारी हॉटेल लावण्याचा त्याचा व्यवसाय आहे़ त्याला मदत करण्याकरीता बिहार येथील रवि नावाचा कारागीर पंधरा दिवसापूर्वी आला होता़ तोही दिनेश साहू यांच्या कुटुंबियासोबतच राहत होता़ आज शनिवारच्या सकाळी 10 वा़ दिनेश साहू हा खैरगाव येथील आठवडी बाजाराकरीता गेला़ घरी पत्नी प्रियंका (23) मुलगा अंशुल (4) हा व कारागीर रवि होता़ ही घटना बहुतेक दुपारी घडली असावी़ दिनेश साहू यांचेकडे गणपती बसला असतांना सायंकाळी 7 वाजले आंधर पडला तरी लाईट लावले नाही़ म्हणून शेजरी राहणाऱ्या बहुरूपे कुटुंबातील मुलीने आत जाऊन लाईल लावले तर तिला बेडरूमध्ये प्रियंका ही बेडवर अस्ताव्यस्त पडलेली रक्तबंबाळ अवस्थेत दिसली़ तिच्या डोक्याशेजारी लोखंडाचा बत्ता होता़ लहान मुलगा अुशंललाही डोक्याला बत्याने मारून रक्तबंबाळ केलेले आढळले़ विशेष बाब म्हणजे प्रियंकाची ओढणी दुसऱ्या खोलीमध्ये आढळ ली छोट्या अंशुलला ग्रामीण रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले़ मृतकांचा पती दिनेश साहू हा खैरगाववरून आल्यानंतर पोलिसांना सांगितले की, 15-20 दिवसांपूर्वी बिहार मधून रवि नावाचा कारागीर आला होता़ तो पत्नी व मुलगा घरी होते़ आज तो बिहारला परत जाणार होता़ विशेष बाब म्हणजे रवि या नावाशिवाय दिनेश कडे त्याची कुठलीही माहिती नाही़ त्यामुळे ही हत्या एक गुुढ बनली आहे़ घटना कळताच ठाणेदार मल्लीकार्जुन इंगळे घटनास्थळी चमूसह दाखल होऊन चौकशी करीत आहे़ अनैतिक संबंध किंवा प्रेमाचा त्रिकोण यातुनच हे हत्या कांड घडले असावे असा प्रथमदर्शनी स्थितीवरून अंदाज लावण्यात येत आहे़ घटना माहिती होताच घटनास्थळावर बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती़

 

रवीने मृत महिलेचा पती दिनेश साहू ला दोन हजार रुपये मागितले होते पण दिनेश याने न दिल्याने त्याचा राग अनावर झाला व दिनेश बाजाराला गेला असता रवीने महिला व तिच्या मुलाचा खून करून वचपा काढला व रवी फरार झाला अशी माहिती नरखेडचे ठाणेदार मल्लिकार्जुन इंगळे यांनी दिली

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।