उद्यापासुन दोन दिवसीय चांदूर रेल्वेत स्वयंरोजगार व उद्योजकता विकास शिबिर – सिद्धिविनायक ग्रुपचे आयोजन

0
619
Google search engine
Google search engine
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
     देशातील बेरोजगारी ही फार मोठी गंभीर समस्या झाली असून खाजगीकरण, जागतीकीकरण, उदारीकरण व संगणकाच्या वाढत्या वापरामुळे युवकांच्या हाताला कामे मिळने कठीन झाले आहे. एकीकडे नोकरी मिळणे कठीन झाले असून अशा परिस्थितीत आपली आर्थीक बाजु सक्षम करण्यासाठी युवकांनी काय करावे हा कठीन प्रश्न त्यांच्या समोर उभा आहे. त्या दृष्टीकोनातून स्वयंरोजगार चळवळ राबवून बेरोजगार युवकांची मानसीकता उद्यमशील करून स्थानीक पातळीवर स्वयंरोजगाराच्या संधी निर्मित होण्याच्या दृष्टीने व युवकांच्या उज्वल अशा भविष्याकरिता सिद्धिविनायक ग्रुप ही संस्था महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तालुका स्तरावर स्वयंरोजगार व उद्योजकता शिबीर राबवित असून धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्वर तालुक्यानंतर आता चांदूर रेल्वे येथे या भव्य दिव्य अशा शिबीराचे आयोजन उद्या ९ सप्टेंबर व १० सप्टेंबरला स्थानिक संताबाई यादव मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजतापासुन केले आहे.
    शिबीरामधे उत्पादन निर्मिती, बाजारपेठ नियोजन, व्यवस्थापन, पशुसंवर्धन व उत्पादन प्रक्रिया, मुल्यवर्धन प्रक्रिया, उद्योगासाठी लागणाऱ्या मशनरीज, बकरीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, ब्युटीपार्लर, मेहेंदि सजावट, अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान आदींचे संपुर्ण मार्गदर्शन या शिबीरात मिळणार आहे. या दोन दिवसीय शिबीराचा बेरोजगार युवक – युवतींनी तसेच महिला, शेतकरी, कामगार, महिला बचत गट सोबतच संपुर्ण चांदूर रेल्वे तालुकावासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धि विनायक ग्रुपतर्फे करण्यात आले आहे. प्रथमच अशा प्रकारचे आयोजन होत असुन तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करणार आहे.