बासलापुर येथील जिल्हा परिषद शाळेत बासलापूर बालसंसद निवडणूक – 8 उमेदवारांनी आजमावले भाग्य

0
506
Google search engine
Google search engine
श्रावणी अवधूत बोबडे हिने सर्वाधिक मत घेत तिची मुख्यमंत्री म्हणून निवड 
चांदूर रेल्वे – (शहेजाद खान) 
     उत्साहाच्या वातावरणात चांदूर रेल्वे तालुक्यातील बासलापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शनिवारी बालसंसद निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ३४ मतदारांनी मतदान करून  १००% मतदानाचा उच्चांक स्थापित केला.
     प्रादेशिक विद्या प्राधिकरण, अमरावती च्या सामाजिक शास्त्र विभागाच्या वतीने जीवनाभिमुख सामाजिक शास्त्र या उपक्रमाअंतर्गत ‘बालसंसद’ हा निवडणूक पर जनजागृती चा उपक्रम सर्वच शाळांवर राबविल्या जात आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकीचा अनुभव घेता यावा म्हणून जि. प. शाळा, बासलापूर येथील शिक्षकांनी अनेक दिवसांपासून मतदार जनजागृती, उमेदवार निवड प्रक्रिया, आचारसंहिता व निवडणुकीच्या अनुषंगाने बारीकसारिक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. शनिवारी सकाळी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये एकूण ८ उमेदवारांनी आपले भाग्य आजमावले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ई.व्ही.एम. मशीन द्वारा मतदानाचा अनुभव देण्याकरिता मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. शालेय परिसरातील विविध चिन्हांचे उमेदवारांना चिन्हांचे वाटप करून मतदान घेण्यात आले. केंद्रप्रमुख वंदना शेळके यांनी केंद्रधिकारी म्हणून तर मतदान अधिकारी म्हणून श्री. केने, श्री. मोदी, कुशल व्यास, श्रीमती नागोशे यांनी भूमिका बजावली. गटशिक्षणाधिकारी सदाशिव दाभाडे यांनी निवडणूक निरीक्षक तर विस्तार अधिकारी छबुताई सोळंके यांनी झोनल अधिकारी म्हणून भूमिका पार पाडली. या निवडणुकीत श्रावणी अवधूत बोबडे हिने सर्वाधिक मत घेत तिची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. तर स्वछता मंत्रीपदी भावेश मंगेश बोबडे, शिक्षण मंत्री नैतिक समाधान खडसे, आरोग्य मंत्री फैजाण एजाज पठाण, क्रीडामंत्री आदिल अन्सार अली, सांस्कृतिक मंत्रीपदी रितिका रतन राऊत यांची निवड करण्यात आली. निवडणुकीनंतर सर्व उमेदवारांना  निवडणूक निर्णय अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी सदाशिव दाभाडे यांचे हस्ते विजयी उमेदवारांचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. या निवडणुकी दरम्यान गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले होते.