सिंदेवाही येथील शिवाजी चौकात दिशादर्शक फलक लावण्याची मांगनी

89

सिंदेवाही तालुका प्रतिनिधी :- सिंदेवाही हे मध्यवर्ती शहराचे ठिकाणी असुन शहरातील चौकात कोणत्याही ठिकाणी दिशादर्शक फलक नसल्याने बाहेरुन येणाऱ्या नागरिकांना याचा नेहमीच त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे शहरातील मध्यठिकाणी दिशादर्शक फलक लावण्याची मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे.
सिंदेवाही हे शहर राष्ट्रीय महामार्गवर असुन एक मध्यवर्ती ठिकाण आहे. शहरातील मध्य ठिकाणी शिवाजी चौक येथे चौरस्ता असल्याने येथे प्रत्येक अनोळखी नागरिक पत्ता विचारत असतो. सिंदेवाही शहरातून चारही बाजूंनी गडचिरोली, चिमुर, चंद्रपूर व नागपूर हे रोड जातात. त्यामुळे अनोळखी नागरिक शिवाजी चौकात येऊन चौकशीअंती समोर निघतो.
प्रत्येक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे परंतु सिंदेवाही शाहरतील मध्यवर्ती ठिकाणी दिशादर्शक फलक नाही याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणतेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे त्यामुळे त्वरित शिवाजी चौक परिसरात दिशादर्शक फलक लावण्याची मागणी शाहरतील नागरिकांनी केली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।