वाघाने केला चक्क पाच गाय-बैलांना ठार

115

*गुंजेवाही (खैरी) परीसरात दहशत*

सिंदेवाही तालुका प्रतिनिधी:- सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील तांबेगडी मेंढा सहक्षेत्रातील गुंजेवाही (खैरी) परिसरात वाघाच्या हल्ल्यात एकाच वेळी पाच गाय बैल ठार केल्याची घटना उजेडात आली .
तांबेगडी मेंढा व गुंजेवाही सहक्षेत्रातील खैरी, कोठा, पवना परीसरात वाघ व पिल्लाचा वावर आहे. नेहमीप्रमाणे दि. 13 सप्टें 2019 सकाळच्या सुमारास गुंजेवाही कोठा येथील गुराखी जनावरे जंगलात चरायला घेऊन गेला असताना वाघाने एकाच वेळी हल्ला कळपावर करून जगीच पाच बैल व गाईना ठार केले त्यामुळे गुराखीनी तात्काळ सावध होऊन गावाकडे धाव घेतली व घटनेची माहिती गावक-यांना दिली.
घटनेच्या दुसर्‍या दिवशी गावातील शेतकऱ्यांनी खैरी जंगलात जाऊन शोध घेतला असता त्यांना पाचही जनावरे वाघाने ठार केल्याचे दिसून आले. घटनेची माहिती तांबेगडी मेंढाचे क्षेञ सहाय्यक चंद्रकात रासेकर यांना दिली.


एकाच वेळी पाच गायबैल ठार केल्याची पहिलाच घटना आहे. सदर वाघाच्या हल्ल्यात वासुदेव दाणे, परसराम मोहूर्ले, रोमन गुरनूले, शालीक लोनबले व गजानन लोनबले या शेतकऱ्यांच्या गाय बैलाचा समावेश आहे. वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्यात बैलाला वाघाने ठार केल्याने शेतकऱ्यांना शेती कशी करायची याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.


सदर घटनेची माहिती मिळताच वनपाल चंद्रकांत रासेकर यांनी चौकशी करीता वनरक्षक गायकवाड यांना पाठवून घटनेचा पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळुन देण्याची कार्यवाही केली.
मागील एक महिन्यात वाघाच्या हल्ल्यात अनेकदा तिन ते चार बैलांना एकाच वेळी ठार केल्याच्या परिसरात दिसुन येत असल्याने वाघाची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मांगणी वनविभागाकडे केली आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।