सुट्टीच्या दिवशी गौण खनिज ची चोरी.सुर्यास्त नंतरही वाहतूक सुरू कार्यवाही करणार का प्रशासन.?

483
जाहिरात

सुट्टीच्या दिवशी गौण खनिज ची चोरी.सुर्यास्त नंतरही वाहतूक सुरू कार्यवाही करणार का प्रशासन.?

चांदुर बाजार

चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा -देऊरवाडा -काजळी माधान – चांदुर बाजार या मार्गावर रोड वर रोज मुरूम ची वाहतूक करणारे ट्रक हे सुरू असतात.अति जास्त प्रमाणात जड वाहतूक असल्याने 3 वर्ष कालावधी  पूर्ण  न झालेल्या काजळी ते माधान रोड वर खड्डे पडले आहे.तर 6 महिन्या आधी झालेला देऊरवाडा ते शिरजगाव कसबा रोडचे सुद्धा अनेक ठिकाणी खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.

गौण खनिज ची वाहतूक करीत असताना संबंधित गौण वाहतूक करणाऱ्या वाहनांना सुर्यदोय ते सूर्यास्त पर्यत चा वेळ दिला असतो.मात्र दिनांक 6 सप्टेंबर ला रात्री च्या दरम्यान   MH 27 X 6857 वेळ 19.00 वाजता ,MH 27 7415 वेळ18.55वाजता ,MH 34 AB 2078 वेळ  या क्रमांकाचे ट्रक हे सूर्यास्त नंतरही गौण खनिज वाहतूक करीत होते.त्यामुळे महसूल विभाग यावर काय कार्यवाही करतील हे प्रश्न चिन्ह असून सार्वजनिक बांधकाम विभाग ची भूमिका सुद्धा या मध्ये अधिक महत्त्व पूर्ण ठरते तर रात्रीला सुद्धा गौण खनिज ची वाहतूक सुरू असताना पोलिस विभाग यांनी कार्यवाही का केली?या मार्गवार शिरजगाव कसबा आणि चांदुर बाजार पोलिसांची हद्द येते.दोन्ही पोलीस स्टेशन पैकी एकही पोलीस स्टेशन यावर कार्यवाही केली नाही.

बॉक्समध्ये
तालुक्यातील रोड वरून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अनेक रोड या जड वाहतूक मुळे उघडले जात आहे.त्यामुळे टाइम लिमिट पूर्वी हे रस्ते घराब होत असल्याने भविष्यात या रोड मुळे खड्याचे साम्राज्य अधिक होणार.त्यामुळे अधिकार जास्त आणि कंबर दुःखी,आणि अपघात ची संख्या वाढणार असल्याचे चित्र रोडवरील खड्यावरून दिसून येते.

फोटो:-दिनांक 6 सप्टेंबर ला गौण खनिज ची वाहतूक करताना ट्रिपर