नेहा नाटेकर याना पुरस्कार प्रदान करतांना गगगनगिरीचे महाराज क्रुष्णराव देव आणि डॉ सुरेश राठोड डॉ सुशिल अग्रवाल व मान्यवर.
शेगाव: दि२४आँगस्ट मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील देउळगांवराजाची लेक व पुण्याची सुन सौ नेहा नाटेकर यांना सन २०२५ चा डॉ सुरेश राठोड फाऊंडेशन मार्शल योगा अकँडमीचा योगातुन उल्लेखनीय समाजसेवा केल्याबद्ल राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करुन कोल्हापुरात आपला डंका केला आहे.
डॉ. सुरेश राठोड फाउंडेशन
मार्शल योगा अकॅडमी
डॉ सुशील अग्रवाल हेल्थ फाउंडेशन संचलित. इंडियन पोलीस मित्र भारत
यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सुरेश राठोड यांच्या पुढाकाराने जो राष्ट्रीय पुरस्कार 2025 दिमाखदार वितरण सोहळा संपन्न झाला आहे या कार्यक्रमाला गगनगिरीचे महाराज क्रुष्णराव देव हे अतीथी म्हणून उपस्थीत होते त्यांचे शुभहस्ते हा पुरस्कार सौ नेहा नाटेकर यांना प्रदान करण्यात आला त्या देऊळावराजा येथील रमेश जपे यांच्या कन्या पुर्वाश्रमीच्या माया जपे आहेत.
पुरस्कार प्रदान समारंभात महाराजांनी भरभरुन आशिर्वाद देउन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि आयोजकांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी मोठ्या संखेने कोल्हापुरातील मान्यवर उपस्थीत होते.






