परळी शहर पोलीस स्टेशनची बेधडक कारवाई :गुटखा माफियांचे धाबे दणाणले

168
https://youtu.be/iEgdshZEkzQ

पीएसआय मेंढके यांच्या पथकाची प्रसंशनिय कामगिरी

बीड

परळी वैजनाथ नितीन ढाकणे
सविस्तर वृत्त : राहुल धस SDPO अंबाजोगाई यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांनी सदरील माहिती परळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मेंडके व त्यांसोबत सह्यायक पोलीस निरीक्षक धस व त्यांच्या सर्व पथकाने मिळालेल्या माहितीनुसार वडसावित्री रोड वर मलिकपुरा येथे एका कंटेनरमधून अवैद्य गुटखा त्या ठिकाणी उतरत आहे अशी माहिती मिळाल्याप्रमाणे

मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाहिले असता कंटेनर क्रमांक एम एच 14 सीएम 9773 यामधून काही लोक पांढऱ्या रंगाच्या मोठ्या बॅग खाली उतरत त्यालगत असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये ठेवत असलेले दिसले. पथकाची चाहूल लागताच बॅग उतरणारे लोक अंधाराचा फायदा घेऊन पहाटेच्या वेळी गल्लीबोळातून पळू लागले ते पळत होते त्या दिशेने शोध घेतला असता ते सापडले नाहीत त्यांचा संशय आणखीन बळावला कंटेनर चालकास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव व्यंकटी लक्ष्मण फड वय 24 वर्षे राहणार उखळी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी असे सांगितले त्याच्यामध्ये काय आहे अशी विचारपूस केली असता त्यांनी सांगितले की सोलापूर येथून यामध्ये गुटखा भरून आलेला आहे काही गुटख्याच्या बॅगा गाडीमध्ये आहेत काही पत्र्याच्या शेडमध्ये आहेत असे सांगून गुटख्याची बॅगा दाखवल्या प्रमाणे पथकाने दोन पंचांना घटनास्थळी बोलून दिसत्या परिस्थितीप्रमाणे पंचनामा केला
पत्र्याच्या शेडमध्ये शेडमध्ये टाकलेल्या गुटख्याच्या गोण्या सुरक्षेच्या कारणास्तव कंटेनर क्रमांक एम एच 14 सीएम 9773 यामध्ये टाकून सदर वाहन पोलीस स्टेशन परळी शहर च्या आवाजामध्ये लावलेला आहे त्याची किंमत गाडीसह 35 लाख रुपये मिळून आली आहे वाहनचालकास पथकाने ताब्यात घेतले आहे त्याचा कंटेनर पोलीस स्टेशन परळी शहर याठिकाणी लावण्यात आलेला आहे सदरील गुटक्याबद्दल अन्न भेसळ अधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे त्यांच्याकडून पंचनामा करून सदर गुटका मालक यांची माहिती घेऊन सदरील कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक मेंडके साहेब पोलीस निरीक्षक धस यांनी माननीय एसडीपीओ साहेब अंबाजोगाई यांच्या आदेशान्वये करीत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले सदरील कारवाई हर्ष पोद्दार साहेब एसपी बीड स्वाती भोर अप्पर पोलिस अधीक्षक अंबाजोगाई राहुल बस एसडीपीओ अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आलेला आहे

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।