कै. महेश देशमुख प्रतिष्ठान यांच्या वतीने तीन तालुक्यात वृक्ष वाटप !!

जाहिरात

कडेगाव तालुक्यातील कै.महेश देशमुख प्रतिष्ठान देवराष्टे यांच्या वतीने २०१९ च्या खरीप हंगामात लागवड करणेसाठी वाळवा (१), खटाव (१), कडेगाव (२१) व आटपाडी(१४) तालुक्यातील हायस्कूल मधील इयत्ता ६ वी तील विध्यार्थी/ विध्यार्थीनीना १३२८ आंबा कलमे तर हायस्कूलना ३० शोभेची झाडे व मोफत वाटप व खाजगी ३५ आंबा कलमे विक्री मिळून एकंदरीत १३९३ आंबा कलमे व शोभेची झाडे वाटप मोफत केली आहेत.
देशमुख प्रतिष्ठाणच्या वतीने गेल्या ५ वर्षात एकूण ३७५१ कलमे व १६० शोभेच्या झाडांचे वाटप केले आहे.
सदर कलमांवर विध्यार्थी / विध्यार्थीनी यांची मालकी असल्याने व कलम पालकांचे शेतजागेत लावल्याने कलमे चांगली जोपासली जातात. प्रतिष्ठान मार्फत जरवर्षी कलम लागवडीचा कार्यक्रम विविध तालुक्यातील हायस्कूल मार्फत राबविला जातो.
प्रतिष्ठाचे अध्यक्ष हिंमतराव देशमुख व इतर सर्व ट्रस्टीज यांच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।