कुरळपूर्णा बनले अवैध वाळूचे केंद्र – नदीपात्रात मोठ्या प्रमाणात रेतीचा ढीग ,तहसीलदार यांनी केले दोन ट्रॅक्टर जमा

0
878
Google search engine
Google search engine

चांदुर बाजार:-

चांदुर बाजार तालुक्याला मोठ्या प्रमाणात नदीचा परिसर लाभला आहे.त्यामुळे या ठिकाणी काळ्या वाळूची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.मात्र कुरलपूर्णा येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात काळ्या वाळूचे ढिगारे लागले असल्याने महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांची भुमीका ही संशयास्पद वाटत आहे.
कुरलपूर्णा येथील भगवानपुरी मंदिर च्या मागच्या बाजूला नदीपात्रात आणि पात्राच्या वर मोठ्या प्रमाणात रेती जमा करून ठेवली जाते त्यानंतर त्याची रात्रीला वाहतूक या वाळू तस्करी करणाऱ्या कडून केली जाते.यामध्ये कमी खर्चात अधिक जास्त नफा मिळत असल्याने युवक वर्ग या मध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे.
या नदीपात्रात रेती काढली जाते त्यानंतर तिचा साठा हा वेगवेगळ्या ठिकाणी केला जातो.यासाठी झाडाचा आसरा घेतला जातो.तर यावर कार्यवाही पासून वाचण्यासाठी कुरलपूर्णा येथील फाट्यावर अवैध वाळू तस्करी करणारे हे लक्ष ठेवून असतात.अधिकारी यांची गाडी आली असता नदी पात्रातील वाळू उपसा करणारे याना सतर्क केले जाते.पोलिस पेट्रोलिग वेळी कुरलपूर्णा येथील युवकाना का विचारणा केली जात नाही हा प्रश्न आहे.
तहसीलदार उमेश खोडके याना मिळालेल्या माहिती वरून त्यानं नदीपात्रात 14 ब्रास वाळू जप्त करून दोन ट्रक्टर विना नंबर जप्त करण्यात आले.नदी पात्राला जागो जागो मोठं मोठे खड्डे या वाळू तस्करी करणारे यांनी पाडून ठेवले आहे.त्यामुळे या वर कार्यवाही करणे फार गरजेचे झाले आहे.तर इतक्या मोठ्या प्रमाणात वाळूचा ढीग लागला असून महसूल प्रशासन आणि पोलीस विभाग यांनी आता पर्यत काहीच कार्यवाही नाही केली.त्यामुळे याचे काही त्या वाळू तस्करी करणाऱ्या सोबत साटेलोटे तर नाही अशी चर्चा नदीपात्रात मधील वाळूच्या ढिगावरून सुरू आहे.

 

आम्हला माहिती मिळाली या कुरळपूर्ण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळूचे ढीग जमा करणयात आले आहे.त्यावर आम्ही त्या ठिकाणी जाऊन कार्यवाही केली असताना दोन ट्रॅक्टर आणि जवळ 12ते 14 ब्रास काळी वाळू जप्त केली आहे.पुढील कार्यवाही सुरू आहे. :- तहसीलदार