*वरुड-टेंभुरखेडा-जरुड-काचुर्णा-हातुर्णा रस्त्यासह – १४७ कोटी रुपयांच्या विकासकामांचे आज भुमिपूजन*

0
550
Google search engine
Google search engine

वरुड- :

वरुड-टेंभुरखेडा-गव्हाणकुंड-बहादा-जरुड-मांगरुळी-काचुर्णा-नांदगांव-हातुर्णा या १४५ कोटी ३२ लक्ष रुपयांच्या रस्ता बांधकामासह एकुण १४७ रुपयांच्या विकासकामांचे भुमिपूजन उद्या १० सप्टेंबर रोजी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस राहतील तर प्रमुख उपस्थितीमध्ये मातोश्री त्रिवेणी महिला सुतगिरणीच्या अध्यक्षा डॉ.वसुधा बोंडे, न.प.नगराध्यक्षा स्वाती आंडे, भाजपा जिल्हाध्यक्ष अंजली तुमराम, तालुकाध्यक्ष ज्योती कुकडे, भाजपा सदस्य माधुरी भगत, भाजपा शहराध्यक्ष राजु सुपले, पं.स.सदस्य ललिता लांडगे, शिल्पा पवार, जि.प.माजी सभापती अर्चना मुरुमकर, स.गा.जि.समिती अध्यक्ष प्रमोद खासबागे, टेंभुरखेडाच्या सरपंचा वंदना पंधरे, वडाळाच्या सरपंचा पुष्पा कोहळे, काचुर्णाच्या सरपंचा मनीषा धुर्वे, शेघाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, तालुकाध्यक्ष मनोज माहुलकर, जिल्हा उपाध्यक्ष रवीराज पुरी, अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष मो.साकिब, महिला आघाडी तालुकाध्यक्ष शालिनी चोबितकर, माजी पं.स.सदस्य रोशनी क्षीरसागर, दक्षता समिती अध्यक्ष स्वप्निल मांडळे, गव्हाणकुंडचे सरपंच नंदकिशोर ब्राम्हणे, जरुडचे सरपंच सुधाकर मानकर, नांदगावच्या सरपंचा अश्विनी पंधरे, वावरुळीच्या सरपंचा निलीमा पडोळे, टेंभुरखेडचे उपसरपंच अशोक पंडागळे, बहादाच्या उपसरपंचा अश्विनी माकोडे, वावरुळीचे उपसरपंच प्रकाश गाठे, नांदगावचे उपसरपंच मनोहर ठाकरे, माजी जि.प.सदस्य गोपाल मालपे, कृ.उ.बा.स.संचालक शशिकांत उमेकर, भाजप उपाध्यक्ष सुधीर धर्मे, विजय यावले, डॉ.शशिभुषण उमेकर, विनोद पाचघरे, रुपेश मदने, नितीन देशमुख, आशिष काकडे, विनोद राऊत, घनश्याम घाटोळे, विनोद ठाकरे, गव्हाणकुंडचे उपसरपंच प्रदिप मुरुमकर, जरुडचे उपसरपंच शैलेश ठाकरे, काचुर्णाचे उपसरपंच नरेंद्र गेडाम, बाळु मुरुमकर, बलदेवराव वानखडे, डॉ.नितीन वानखडे, डॉ.अमोल कोहळे, प्रविण कुंडलकर, महादेव जवादे, बाबाराव पांडव, पिंटु मेंढे, राजु मानकर, अरुण विरखरे, मंगेश कोरडे यांचेसह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे भुमिपूजन सायंकाळी ४ वाजता टेंभुरखेडा, ४.३० वाजता गव्हाणकुंड, ५ वाजता बहादा, ५.३० वाजता जरुड, ६.३० वाजता मांगरुळी, ७ वाजता काचुर्णा, ७.३० वाजता नांदगांव, ८ वाजता हातुर्णा येथे घेण्यात येणार आहे. या संपुर्ण भुमिपुजन सोहळयाला नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते शहर व ग्रामिण यांचे वतीने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.