तासिका निदेशक यांवरील अन्याय थांबवा-अकोला येथे आयटीआय निदेशक संघर्ष समितीचे धरणे

0
672

अमरावती जिल्ह्यातीलही तासिका निदेशकांचा समावेश

अमरावती : (शहेजाद खान)

महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघर्ष समितीने सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. या धरणे आंदोलनात अमरावती जिल्ह्यासह राज्यभरातील निदेशक सहभागी झाले होते. आयटीआय मधील अनुभवी तासिका निदेशक यांना तात्काळ नियुक्ती देण्यात यावी, आयटीआयमधील तासिका तत्व तत्वावर मंजुरी कंत्राटी रिक्तपदे समावून घेण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. कौशल विकास व उद्योजक विभागात २०११ पासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयात निदेशकांची अनेक पदे रिक्त आहे. या पदांवर राज्यातील ४१७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये सुमारे ३ हजार तासिका निदेशक गेल्या अनेक वर्षांपासून प्रशिक्षण देत आहे. राज्यातील ४१७ शासकीय आयटीआयमध्ये निदेशकांची सुमारे ५० टक्केच्या वर मंजूर रिक्त पदे असून या सर्व रिक्त पदांवर तासिका निदेशक कार्यरत आहेत.