जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत देवयाणी इंटरनेशनल स्कुल विजयी

0
573
Google search engine
Google search engine

१४ वर्षीय मुलीचा कबड्डी संघ विभागस्तरावर

सिंदेवाही- महाराष्ट्र राज्य क्रीड़ा व युवक सेवा संचालनालय पुणे अन्तर्गत जिल्हा क्रीड़ा  परिषद व जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय चंद्रपुर चे वतीने

दि. ८ सप्टेबर ला  जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपुर येथे  मैदानावर क्रीड़ा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत जिल्ह्यातील कबड्डी संघाने सहभाग नोंदविला होता.

या स्पर्धेत  १४ वर्षीय मुलिंच्या गटात देवयाणी इंटरनेशनल स्कुल सिंदेवाही संघाने विजय प्राप्त केला. यामध्ये सिंदेवाही संघाने  प्रथम सामना राजुरा संघावर विजय नोंदविला , उपान्त्य फेरीत ब्रम्हपूरी संघावर विजय प्राप्त  केला व अंतिम सामन्यात नागभीड संघाचा  पराभव  करूंन बाजी मारली . विजयी संघाची नागपुर येथे होणाऱ्या विभागस्तरीय  कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी संघाचे देवयानी इंटरनेशनल स्कुलचे प्राचार्या सौ. कविता कटकमवार व सर्व शिक्षकवृंद कडून कौतुक केले जात आहे. विजयी संघाने आपले यशाचे श्रेय स्कुलचे प्राचार्या सौ. कविता कटकमवार, क्रीड़ा शिक्षक सौ. शितल डांगे, व निखिल मसराम यांना दिले आहे. प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातही अशीच प्रगती करावी तसेच शाळेचे व स्व:ताचे नाव रोशन करावे, असे मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी  शुभेच्छया दिले. याप्रसंगी शाळेतील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सहभागी मुलीचा कबड्डी संघ:-

कल्याणी मानकर , भारती श्रीरामे, मयुरी पलके, शारदा पलके, सानीका दांडेकर, स्वेता गजभे , ऋतुजा जिवतोडे, तनुजा मंगर, विश्रांति गेडाम,

 सानीका मडावी, टकेश्वरी दोडके , सानिया उईके