सर्वोदय कन्या कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाही संघ पोहचला विभागस्तरावर

202
जाहिरात

सिंदेवाही:-विद्या प्रसारक संस्था, सिंदेवाही द्वारा संचालित सर्वोदय कन्या कनिष्ठ विद्यालय, सिंदेवाही कबड्डी संघाची विभागस्तरावर निवड करण्यात आली.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सत्र २०१९-२० मध्ये कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये अनेक तालुक्यातील संघ सहभागी झाले.
१९ वर्षाखालील मुलींच्या कबड्डी अंतिम सामन्यात सर्वोदय कन्या कनिष्ठ महाविद्यालय, सिंदेवाही ने आनंद निकेतन कनिष्ठ महाविद्यालय वरोरा चा ६० गुणांनी पराभव करून विजय संपादन केले. या संघाची विभागीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड करण्यात आली व चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान प्राप्त झाले.
विजयी संघाचे अभिनंदन प्राचार्या संगीता यादव,पर्यवेक्षक दडमल, प्रा.जोगी, प्रा.बनकर,संदिप भरडकर,सलामे, विनय खोब्रागडे यांनी केले. खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय प्रा.मनोज पाकमोडे व क्रीडाशिक्षक ठिकरे यांना दिले.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।