*कडेगावचा मोहरम म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक!!

339
जाहिरात

संपूर्ण हिंदुस्थानात जाती-धर्मांमध्ये असणारे तेढ आणि त्यातून होणाऱ्या दंगली त्यामुळे एकंदरीतच माणुसकी लोप पावत चालली आहे.
यालाच एक अपवाद म्हणजे सांगली जिल्ह्यातील हिंदु मुस्लिम ऐक्याचे प्रतिक कडेगाव होय! येथील मोहरम उत्सव या मोहरम उत्सवाला हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक मानले जाते. या मोहरम उत्सवाने दीडशे वर्षांची परंपरा कायम ठेवत यावर्षीही मोहरम सण अतिशय उत्साहात संपन्न झाला.
जाती-धर्मांमध्ये असणारे तेढ बाजूला सारत कडेगाव तालुक्याने हिंदू-मुस्लिम एकतेचा सलोख्याचा वस्तुपाठ मांडला एक वाजून पंचवीस मिनिटांनी ताबूतांची गळाभेट झाली. कडेगाव च्या ताबूत सोहळ्याला जागतिक उत्सवाचा दर्जा आहे. आपल्या देशासह जगभरातील अनेक देश या उत्सवाची दखल घेतात.
या सोहळ्यासाठी देशभरातून हजारो लोक येत असतात. जगभरामध्ये अशांतता पसरली असताना या सोहळ्याने धार्मिक दहशतवाद्यांना एक चांगला धडा दिला आहे. हा उत्सव सामाजिक एकतेचा आणि अखंडतेचा पाया ठरला आहे. कडेगावातील या अभूतपूर्व सोहळ्याला दीडशे वर्षाची परंपरा आहे. तेव्हापासून कडेगावचा डोळ्याचे पारणे फेडणारा ताबूत भेटीचा सोहळा आयोजित केला जातो. हिंदू आणि मुस्लिमांचे एकूण चौदा ताबूत या उत्सवामध्ये सहभागी होतात. आज सकाळी ११ वा.देशपांडे यांचा ताबुत व सातभाईच्या ताबुत जवळ आला.त्यानंतर मानाच्या सातभाई ताबुतची पुजा अर्चा करून तो उचलण्यात आला व मिरवणुकीने पाटील चौकात दाखल झाला.तेथे हकीम,आत्तार,बागवान यांचे ताबुत आले.हे सर्व ताबुत मिरवणुकीने भैरवनाथ मंदिराच्या मार्गाने सुरेशबाबा चौकात भेटीसाठी आले दु.साडेबारा वा.कळवात व सुतार यांचे ताबुत उचलण्यात आले व भेटीसाठी सुरेशबाबा देशमुख चौकात आले त्यानंतर बारा इमाम मसुदा नामा व पंजे मानकरी देशमुख,सुतार,शिंदे, देशपांडे,शेटे आदि मानकऱ्यातर्फे भेटीच्या ठिकाणी दुपारी १वा.दाखल झाले.मानाप्रमाणे ताबुत उचलुन पारंपरिक पद्धतीने सुरेश बाबा चौकात ताबूत भेटीचा सोहळा अतिशय उत्साहात व भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला. गगनचुंबी ताबूतांच्या गळा भेटीचा प्रसंग चित्तथरारक व तितकाच नयनरम्य असा होता. ताबूत भेटीनंतर लोकांनी शिट्ट्या व टाळ्या गजरात आनंद व्यक्त केला. मानाप्रमाणे परत आपापल्या ठिकाणी जाऊन पोहचले दुपारी २ वा. बागवान यांचा ताबुत जागेवर जाऊन बसल्यावर मोहरमची सांगता झाली.यावेळी आमदार मोहनराव कदम, आमदार. पृथ्वीराज देशमुख, आमदार. डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख ,तहसीलदार अर्चना शेटे, नगराध्यक्ष सौ.नीता देसाई, उपनगराध्यक्ष राजू जाधव, गुलाब पाटील, चंद्रसेन देशमुख, सुरेशचंद्र थोरात, दीपक भोसले, मालन मोहिते, जितेश कदम, नायब तहसीलदार राजेंद्र यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.मोहरमच्या ताबुत भेटी सोहळा नेत्रदीपक व भक्तीमय वातावरणात व शांततेत पार पडला.यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक मनिषा दुबिले यांच्या मार्गदर्शनाखाली डिवायएसपी अशोक इंगळे व कडेगांव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बिपीन हसबनिस व सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।