चाळीस वर्षाच्या जन संघर्षाची पावती म्हणून विधानसभेत संधी द्या ―प्रा. टी .पी .मुंडे

0
731
Google search engine
Google search engine

राष्ट्रवादी व पुरोगामी विचारांच्या पक्षांनाही घातली साद !

परळी/प्रतिनिधी:  नितीन  ढाकणे 

चाळीस वर्ष जनकल्याणासाठी संघर्ष केला. स्वार्थ, सत्ता ,पदाचा विचार केला नाही याच कामाची पावती म्हणून मला विधानसभा निवडणुकीत संधी द्या असे भावनिक आवाहन काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा टी पी मुंडे सर यांनी केले. सन 2009 पासून परळी विधानसभा मतदारसंघ पुरोगामी विचाराच्या आघाडीत काँग्रेस पक्षाकडे आहे आताही तो कायम काँग्रेसकडेच ठेवून मला उमेदवारी दिली पाहिजे त्यासाठी मित्र पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व पुरोगामी विचाराच्या पक्ष संघटनांनी सहकार्य करावे अशी सादही त्यांनी घातली.

सार्वजनिक गणेशोत्सवात स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख दावेदार प्रा टी पी मुंडे सर यांनी स्वतःच्या 40 वर्षाच्या राजकीय वनवासाचा इतिहास उघड केला. विद्यार्थी दशेपासून स्वार्थ, सत्ता, पद याचा विचार न करता केवळ जनकल्याणासाठी संघर्ष केला. माझ्या सामाजिक कार्याच्या या संघर्षाचा सन्मान ठेवूनच परळी विधानसभा मतदारसंघातील मतदार माझ्या पाठीशी आहेत. याच भावनेची कदर करून आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांनी मला यावेळी सहकार्य करावे व पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले

एका प्रश्नाच्या उत्तरात प्रा टी पी मुंडे सर यांनी सन 2009च्या निवडणुकीपासून चा परळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास मांडला सन 2009 साली मी भाजपाच्या ना. पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध एकटा लढलो 65 हजार 700 मते मिळविली यात माझा निसटता पराभव झाला परंतु आता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पुरोगामी विचाराचे पक्ष सोबत असल्याने या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी महाराष्ट्रात पुरोगामी विचाराच्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज प्रतिपादित करून वंचित बहुजन आघाडीनेही काँग्रेससह पुरोगामी विचाराच्या पक्षांसोबत यावे हीच काँग्रेसची भूमिका आहे कारण पुरोगामी विचारांच्या मतांमध्ये फूट पडली तर त्याचा फायदा भाजपा सारख्या जातीयवादी पक्षांना होऊ शकतो अशी भीतीही प्रा टी पी मुंडे सर यांनी व्यक्त केली . परळी मतदारसंघात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व पुरोगामी विचाराचे पक्ष एकत्र आले तर आपला विजय निश्चित होतो हे मागील जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी निवडणुकीतून सिद्ध झाले आहे याची आठवण करून दिली.

चौकट

राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा !

परळी विधानसभा मतदारसंघ सन 2009 पासून काँग्रेसचा आहे हा काँग्रेसकडेच राहील त्यात आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस व पुरोगामी विचाराच्या पक्षांनी पाठिंबा द्यावा. माझा चाळीस वर्षाचा जनसंघर्ष व माझी जेष्ठता पाहून मला यावेळी विधानसभेत जाण्याची संधी आली आहे असे आपण राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांना सांगितले व तुम्ही तर 2023 पर्यंत आमदार आहात त्यामुळे मला या निवडणुकीत पाठिंबा द्या. माझ्या राजकीय आयुष्यातील ही शेवटची निवडणूक आहे असे सांगितले यावर बोलताना ना. धनंजय मुंडे यांनीही मला सर परळी मतदारसंघावर तुमचाच हक्क आहे असे कबूल केल्याचेही प्रा टी पी मुंडे सर यांनी सांगितले.