तालुक्यात अवैध दारू धंद्याविरोधात पोलीसांची मोहीम – तीन गावांत केला केला मोहाच्या सडव्याचा माल नष्ट

197
जाहिरात
ठाणेदार संतोष भंडारे यांच्या नेतृत्वात धडक कारवाई
चांदूर रेल्वे –
    अमरावती ग्रामिणचे पोलीस अधिक्षक हरीबालाजी एन., अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, चांदूर रेल्वेचे उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश शिंगटे व स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामिणचे पोलीस निरीक्षक किणगे यांच्या मार्गदर्शनाखाली व चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार संतोष भंडारे यांच्या नेतृत्वात चांदूर रेल्वे तालुक्यात अवैध दारू धंद्याविरोधात पोलीसांनि मोहीम राबविली. यामध्ये तीन गावांत मोहाच्या सडव्याचा माल नष्ट केला आहे.
     मिळालेल्या गुप्त माहितीवरून ठाणेदार संतोष भंडारे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामिण ची चमु, एक स्ट्राईकींग फोर्स व चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ग्राम तरोडा, पळसखेड व बासलापुर शेतशिवारात धाड टाकुन मोहाच्या सडव्याचा माल अवैधरित्या मिळून आल्याने जप्त करून जागेवरच नष्ट करण्यात आला. अवैध धंदे करणाऱ्यांनी सावधान राहा, अवैध धंदे बंद करा, नाही तर कारवाई करणारच असे ठणकावून सांगितले. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक तेलगोटे, पोलीस उपनिरीक्षक मुपडे यांच्यासह ५८ कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।