गणगणे विद्यालयाच्या खेळाडूंची धनुर्विद्या (आर्चरी)स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

220

गणगणे विद्यालयाच्या खेळाडूंची धनुर्विद्या (आर्चरी)स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

आकोट: स्थानिक श्रीमती लक्ष्मीबाई गणगणे विदयालयाचे वर्ग 9 मधील ओम राजेंद्र टवले,कु.अंकिता संजीव कुमार गाडगे व वर्ग11वी मधील कु.सायली प्रविण झाडे यांनी अकोला येथे दि.7 सप्टेंबर 2019 ला पार पडलेल्या जिल्हास्तरिय शालेय शासकीय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेत फीटा राउंड प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करीत अमरावती विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
सदर स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. विजयी खेळाडू शारीरिक शिक्षण शिक्षक निलेश झाडे व राष्ट्रीय खेळाडू प्रणव बहादूरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या विभागीय ,राज्य पातळीसाठी तयारी करीत आहे. यशस्वी खेळाडूचे आंतरराष्ट्रीय पंच तथा राज्य मार्गदर्शक लक्ष्मीशंकर यादव, संस्था अध्यक्ष प्रभाकरराव गणगणे,सुमंगलाताई गणगणे,गजाननराव गणगणे,अर्चनाताई गणगणे व मुख्याध्यापक गजाननराव निमकर्डे यांनी अभिनंदन केले आहे.