प्रधानमंत्री उज्ज्वला योजने अन्तर्गत लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप

163
जाहिरात

प्रत्येक उपेक्षित घरात गॅस कनेक्शन पोहचवणे हेच सरकारचे उद्दिष्ट……..प्रा अतुलभाऊ देशकर

सिंदेवाही- “प्रधानमंत्री उज्ज्वला योजना” ही भारत सरकार आणि मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या अनेक महत्वाकांक्षी योजनांपैकी एक यशस्वी योजना आहे. या योजनेमुळे देशातील अनेक उपेक्षित घराघरात फ्री गॅस कनेक्शन पोहोचून चुली पेटल्या आणि गोरगरिबांना न्याय देण्याचं काम सरकारकडून होत आहे.

याच पार्श्वभूमीवर दि.११/०९/२०१९ ला सिंदेवाहीतील पंचायत समिती सभागृहमध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअन्तर्गत लाभार्थी महिलांना ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांच्या हस्ते गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले यावेळी अंदाजे २५० लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शनचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाला  प्रा. गणवीर सर, साईनाथ कुर्रेवार, प्रफुल महाजन, अमोल बल्लेवार, मनोहर लोखंडे, स्थानिक भाजपा चे पदाधिकारी व कार्यकर्ते, महाजन गॅस सिंदेवाहीचे कर्मचारी आणि बहुसंख्येने ग्रामस्थ बंधु भगिनी उपस्थित होते.

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।