पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी भुमीचे गणेश मंडळांना वृक्षदान अकोटः प्रतिनीधी

0
798
Google search engine
Google search engine

पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी भुमीचे गणेश मंडळांना वृक्षदान

अकोटः प्रतिनीधी

पर्यावरण पुरक गणेशोत्सवासाठी भुमी फाउंडेशनद्वारा
दरवर्षी निर्माल्य संकलन मोहीम राबवण्यात येते यावर्षी ही मोहीम मंगळवार दि.१० रोजी पार पडली.या मोहीमेला नागरीकांसह गणेश भक्तांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.
भूमी फाऊंडेशन च्या वतीने गणपती उत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्यासाठी व जल प्रदूषण व उत्सवाचे पावित्र्य कायम राहण्यासाठी गणपती मंडळाना भूमी च्या माध्यमातून अकोट शहराती प्रत्येक गणपती मंडळाच्या व घरगुती गणपती भक्ता कडुन निर्माल्य रथ फिरवून निर्माल्य गोळा करणात आले.तसेच गणपती मंडळाना एक वृक्ष दत्तक देऊन वृक्ष सर्वधंन जबाबदारी गणेश भक्तांना देण्यात आली.यावेळी
निर्माल्य संकलन रथाच्या प्रस्थान करीता व उद्घाटना साठी आकोट शहरचे ठाणेदार संतोष महल्ले तसेच भूमीचे पालक मार्गदर्शक कॕप्टन सुनिल डोबाळे यांनी भूमी च्या उपक्रम चे कौतुक करुन मार्गदर्शन केले.
तसेच या उपक्रमासाठी भूमीचे सर्व सदस्य चंचल पितांबवाले,अँड रुचा ठाकूर,सौ.शिल्पा राठी,विशाल राठौर,पंकज अंबूलकर,आकाश धुमाडे,कमलेश राठी,अगस्ती ठाकूर,हर्षल बाहदूरे,अमोल पवार,सुनिल मस्करे,अक्षय जायले आकाश तायडे या निर्माल्य रथाचे नगर परीक्रचे संचालन संतोष विणके तर अभार प्रदर्शन तुषार अढाऊ यांनी केले.