पर्यावरण पूरक गणेशमूर्तीसाठी तरुणाईचा अभिनव उपक्रम-टार्गेट अकादमीच्या अभिनव उपक्रमाचे दुसरे वर्ष

178
जाहिरात

शंभर हुन अधिक विद्यार्थी चा सहभाग

अकोट: संतोष विणके –

स्थानिक अकोट शहरातील टार्गेट अकादमी येथे आज विद्यार्थ्यांकडून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली, प्लास्टर ऑफ पॅरिस सारख्या जलप्रदूषण करणाऱ्या मूर्तीपेक्षा शाडू माती किंवा इतर पर्यावरण पूरक वस्तू पासून, शास्त्राला अनुसरून गणेश मूर्तीची निर्मिती करण्यात आली
शाडूमाती आणि वृत्तपत्र चा लगद्यापासून मूर्ती तयार करण्याचा प्रयोग आज कैलासजी वर्मा यांचा संकल्पनेतून साकारण्यात आला
गणपती विसर्जनानंतर मूर्तीची काय अवस्था होते, विसर्जनानंतर तिची विटंबना होऊ नये ,जलप्रदूषण होऊ नये यासाठी हा अभिनव प्रयोग केल्याचे त्यांनी सांगितले ,
यावेळी शंभरहून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते ,


विद्यार्थ्यांनी या मूर्तीवर कलाकुसर करुन त्या आकर्षक बनविल्या ,मूर्ती बनविण्यासाठी शाडूमाती ,कागदाचा लगदा ,गोंद, आणि नैसर्गिक रंग यावेळी वापरण्यात आला ,
ह्या मूर्त्या पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती, यावेळी उपक्रमाला भेट देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पी ओ पी पासून बनविण्यात येणाऱ्या मूर्ती पासून पर्यावरणाचा काय ऱ्हास होते ,शाडूमातीचे गणपती का आवश्यक आहेत, ह्याची निर्मिती घरचा घरी कशी करावी प्लास्टर ऑफ पॅरिस चा मूर्ती घरी बसविल्या असतील तर त्या मूर्ती घरचा घरी विसर्जित करण्यासाठी अमोनियम बाय-कार्बोनेट पावडर टाकून कशा नष्ट केल्या जातील जेनेकरून पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले,

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।