तहसीलदार उमेश खोडके याची कार्यवाही 67 ब्रास वाळू साठा केला जप्त,कुरलपूर्णा अवैध वाळू वर धडक कार्यवाही,कोतवाल चे नातेवाईक करतात काम.कोतवाल मात्र गायब. अमरावती/चांदुर बाजार

0
731
Google search engine
Google search engine

तहसीलदार उमेश खोडके याची कार्यवाही 67 ब्रास वाळू साठा केला जप्त,कुरलपूर्णा अवैध वाळू वर धडक कार्यवाही,कोतवाल चे नातेवाईक करतात काम.कोतवाल मात्र गायब.

अमरावती/चांदुर बाजार

कुरलपूर्णा येथील नदी पात्रात मोठया प्रमाणावर अवैध वाळूचे ढिग लावून त्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसीलदार उमेश खोडके याना मिळाली त्यांनी त्या आधारे त्या ठिकाणी रेड केली असता सुरुवातीला त्यांनी दोन ट्रॅक्टर जप्त केले.तर त्या भागाची पाहणी केली असता नदीपात्रात जवळपास 67 ब्रास वाळू साठा त्यांनी जप्त केला.चांदुर बाजार तालुक्यातील तामसवाडी प्रकरण नंतर ही सर्वात मोठी कार्यवाही असल्याचे बोलले जात आहे.या मध्ये अवैध पने वाळूची तस्करी करणारे याचे दोन ट्रॅक्टर पळून गेले.

महसूल विभागाच्या या कार्यवाहिमुळे अनेक अवैध वाळू तस्करी करणारे याना घाम सुटला आहे.तर त्यांनी जमा केलेली वाळू ही तहसीलदार यांनी जप्त केल्याने त्याच्या लाखो रुपयांचा उत्पन्न बुडाले असल्याने त्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे.

या ठिकाणी महसूल विभागाच्या ग्रामीण पातळीवर काम करणारा कोतवाल हा गावचा प्रमुख असतो पण कुरलपूर्णा येथील कोतवाल ही महिला असून या ठिकाणी तिचे नातेवाईक मागील काही काळापासून इथला कार्यभार पाहत आहे.त्यामुळे वाळू तस्करी करणारे यांनी आपला या ठिकाणी मोठा परिसरात आपल्या ताब्यात घेतला आहे.तर या कोतवाल वर तहसीलदार कोणती कार्यवाही करणारे हा प्रश्न आहे.सध्या जप्त केलेली वाळू ही नदीपात्रात असून तिचा लवकरच लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अमरावती जिल्ह्यातील अनेक मोठ्या कार्यवाही मध्ये चांदुर बाजार तहसीलदार याची ही कार्यवाही सुद्धा पुन्हा आता चर्चेत आहे.त्यामुळे आता इतर महसूल मधील मंडळ मधील अवैध वाळू तस्करी करणारे यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.