*माजी जि.प.सभापती शंकरराव मानकर यांचा – शेकडो कार्यकत्र्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश*

0
610
Google search engine
Google search engine

वरुड – एकीकडे संपुर्ण महाराष्ट्रात विविध पक्षांतून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेणा:यांची रिघ लागली असतांना मोर्शी मतदारसंघात सुध्दा राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे यांचे नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेणा:यांची रिघ लागली आहे. आज जि.प.माजी बांधकाम सभापती तथा आमनेर जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शंकरराव मानकर यांनी त्यांच्या शेकडो कार्यकत्र्यांसह डॉ.अनिल बोंडे यांचे उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून शंकरराव मानकर हे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांचे नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना सतत गुदमरल्यासारखे वाटत असल्याने ते अस्वस्थ होते, अशा स्थितीत डॉ.अनिल बोंडे यांना राज्याचे कृषिमंत्री मिळाल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आणि त्यांनी डॉ.अनिल बोंडे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवुन आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
शहरातील कोल्हे सभागृहामध्ये पार पडलेल्या या प्रवेश समारंभाप्रसंगी कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अनिल बोंडे, माजी जि.प.सदस्य गोपाल मालपे, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कार्यकारी सदस्य मोरेश्वर वानखडे, रमेश हुकूम, कृषि उद्योग महामंडळाचे संचालक विजय श्रीराव, भाजपा जेष्ठ युवा कार्यकर्ते निळकंठ उर्फ बाळासाहेब मुरुमकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजकुमार राऊत, शहराध्यक्ष राजु सूपले, डॉ.वामनराव ठाकरे, आत्माचे सदस्य प्रविण कुंडलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी जि.प.माजी बांधकाम सभापती शंकरराव मानकर, प्रिमत शंकरराव मानकर, चंद्रशेखर काळे, सौरभ मानकर, राजेश लायबरे, राहुल मानकर, रोशन निंबोरकर, दिनेश काकडे, मनोज मानकर, किशोर राऊत, गौरव वानखडे, दिनेश ठाकरे, मयूर ठाकरे, भैय्यासाहेब मानकर, रुपराव च:हाटे, गौरव शेळके, गजानन उपरकर, गजानन भोगे, प्रदीपराव ठाकरे, गजानन ठाकरे, विजयराव मानकर, दिलीपराव पुंड, वालजीभाई पटेल, अजाबराव पारडसिंगे, पांडुरंग कोल्हे, सागर जैस्वाल, अनिल गुडधे, चंद्रशेखर राऊत, मधुकरराव धर्माळे, हरिश्चंद्र भोंडे, महेंद्र राऊत, शिवलाल आहाके, राजु देशमुख, संजयराव चेर, श्रीराम मानकर, प्रदीप अकर्ते, रामराव भुसारी, अशोकराव मानकर, राजेंद्र भिसे, बाळकृष्ण मानकर यांचा समावेश आहे.