चांदूर रेल्वे शहरात १.५० कोटी रु. भूमिपूजन व लोकार्पण

0
927
Google search engine
Google search engine

चांदूर रेल्वे शहरात आज विविध लोक उपयोगी कामांचे उद्घाटन आमदार प्रा.वीरेंद्र जगताप यांचे हस्ते पार पडले

चांदूर रेल्वे:

                   चांदूर रेल्वे नगर परिषद अंतर्गत येणारा निधी २५१५ वी. नी. जिल्हा निधी लेखा शिर्ष निधी अश्या विविध हेड खाली चांदूर रेल्वे नगरीचा विकास व्हावा हेच लक्ष डोळ्या समोर  ठेवून विकासाला आणखी गती कशी देता येईल व शहरासाठी जास्त निधी कसा येईल हाच प्रामाणिक प्रयत्न जगताप साहेब करत आहे  आणि विकास कामे होत असताना जनतेच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. काही व्यापारी वर्गाने आपल्या व्यथा जगताप साहेबा समोर मांडला ते म्हणाले की जी.एस.टी व देशपातळीवर आलेली मंदी यामुळे व्यापार करण्यासाठी घरून भांडवल खर्च करावे लागत आहे. काही शेतकरी वर्गाने सुधा आपल्या व्यथा मांडल्या पीक विमाचे पैसे, कृषी मालाला दीडपट हमीभाव. वाढलेले खताचे भाव, प्रधानमंत्री कृषीसन्मान योजनेचे मिळालेच नाही. सरकारने शेतकऱ्यांचा सन्मान सोडून अपमान करेने हाच ध्यस घेतला आहे. असा आक्रोश चांदूर रेल्वे शहरातील लोकांमध्ये दिसत होता. या निवडणुकीमध्ये चॉकलेट देणाऱ्या सरकारच्या विरोधात मतदान करायचं हेच जनतेमध्ये जाणवत होते.कार्यक्रमाला जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाने, चांदूर रेल्वे चे नगराध्यक्ष निलेश उर्फ शिटटू सुर्यवंशी, उपाध्यक्ष देवानंद खुने, निवास सूर्यवंशी, प्रदीप वाघ, जगदीश आरेकर, संतोष खुने, श्रीकांत माने, भुषण बाबर, वैभव गायकवाड, बंडूभाऊ देशमुख, प्रदीप वाघ, रूपेश पुडके, शेहजाद सौदागर, संदीप शेंडे, सुमेद सरदार, बंडू आठवले, अमोल होले, अजिंक्य दुबे. संतोष कडू, निवास सूर्यवंशी, प्रणव भेंडे, महेश कलावटे, कल्पनाताई लांजेवार, शुभांगीताई वानरे आदी मान्यवरांसह अनेकांची उपस्थित होती.