मोदी-शाहा शिवरायांच्या विचाराने कार्यरत – उदयनराजे

205
जाहिरात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या  खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

बीड : दिपक गित्ते, नितीन ढाकणे 

अमित शाहांच्या उपस्थितीत प्रवेश

भाजप अध्यक्ष अमित शाह, जे पी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत उदयनराजे भोसले भाजपमध्ये डेरेदाखल झाले. रात्री उशिरा दिल्लीत दाखल झालेल्या राजेंनी रात्री सव्वा वाजता लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उदयनराजेंसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते.

प्रवेशानंतर उदयनराजेंनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं. काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचं धाडस मोदींनी दाखवलं. माझ्या लहानपणापासून काश्मीरप्रश्नबद्दल ऐकत होतो, पण कोणीही त्यावर उत्तर शोधत नव्हतं. पण मोदींनी ते धाडस दाखवलं, असं उदयनराजे म्हणाले. मोदी-शाहा शिवरायांच्या विचाराने कार्य करत असल्याचंही उदयनराजेंनी नमूद केलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या निवासस्थानी उदयनराजेंचा भाजप प्रवेश प्रवेश झाला. अमित शाह गृहमंत्री झाल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी एखाद्या नेत्याचा भाजप प्रवेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भाजप छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना पुढे घेऊन जात आहे. प्रत्येक राज्यात भाजप वाढत आहे. अनेक लोक भाजपशी जोडले जाण्यास इच्छुक आहे. त्यामागे हेच कारण आहे. लहानपणापासून काश्मीरचा विषय होता. मात्र, कुणीही त्याकडं लक्ष दिलं नाही. संपूर्ण देश एक राहावा, भारत मजबूत व्हावा म्हणून मोदींनी महत्त्वाची पाऊलं उचलली. ते निर्णय योग्य आहेत – उदयनराजे भोसले

 

 

जाहिरात

Vidarbha24News युट्युब चॅनेल ला सबक्राईब करा

नोटिस: समाचार / में उद्धृत स्रोत लिंक केवल समाचार / आलेख प्रकाशित होने की तारीख पर मान्य हो सकते हैं। उनमें से अधिकतर एक दिन से कुछ महीने बाद अमान्य हो सकते हैं। जब कोई न्यूज लिंक  काम करने में विफल रहता है, तो आप स्रोत वेबसाइट के शीर्ष स्तर पर जा सकते हैं और समाचार / आलेख की खोज कर सकते हैं।