बोधेगांवची जिल्हा परिषद शाळा नाथ प्रतिष्ठान बांधुन देणार

0
682
Google search engine
Google search engine
धनंजय मुंडेंच्या हस्ते उद्या रविवारी कामाचा शुभारंभ
प्रकाशदादा सोळंके, आ.रामराव वडकुते, प्रा.टी.पी.मुंडे, बाबुराव पोटभरे, बजरंगबप्पांची उपस्थिती

परळी वैजनाथ दि. 14………………………तालुक्यातील बोधेगांव येथील जिल्हा परिषद शाळा नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातुन बांधुन देण्याचे आश्‍वासन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पुर्ण केले असुन उद्या रविवार दि. 15 सप्टेंबर रोजी या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होणार आहे.


सायंकाळी 7 वा. बोधेगांव येथे होणार्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणुन आ.रामराव वडकुते, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा.टी.पी.मुंडे सर, बहुजन विकास आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबुराव पोटभरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंगबप्पा सोनवणे, माकपचे नेते अजय बुरांडे, उत्तमराव माने व तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती मार्केटचे संचालक माऊली तात्या गडदे व नाथ प्रतिष्ठानचे सचिव नितीन कुलकर्णी यांनी दिली.
बोधेगांव येथील 4 खोल्यांची 40 वर्षापुर्वीची जिल्हा परिषदेची शाळा मोडकळीस येऊन कोसळली होती. सन 2000 पासुन ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठपुरावा करूनही शासनाकडुन एका खोलीचेही बांधकाम करून देण्यात न आल्याने व 2019 मध्ये शाळेच्या मोडकळीस आलेल्या 2 खोल्यांचेही पत्रे उडुन गेल्याने महादेवाच्या मंदिरात ही शाळा भरत होती. अखेर माऊली गडदे व गावकर्‍यांनी शाळेसाठी उपोषण सुरू केल्याने धनंजय मुंडे यांनी उपोषणास भेट देऊन नाथ प्रतिष्ठानच्या वतीने 5 खोल्या बांधुन देण्याचे आश्वासन दिले. याच कामाचा शुभारंभ रविवारी होत असुन त्यामुळे गावातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाची अडचण सुटणार आहे.
या कार्यक्रमास जि.प.सदस्य संजय दौंड, युवक नेते अजय मुंडे, कृ.उ.बा.सभापती ऍड.गोविंद फड, पं.स. सभापती मोहनराव सोळंके, रा.कॉं.तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, नगरसेवक चंदुलाल बियाणी, रा.कॉं. शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, रा.कॉं. प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे, रा.यु.कॉं.प्रदेश सरचिटणीस रणजीत लोमटे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सुर्यकांत मुंडे, कृ.उ.बा.माजी सभापती सुर्यभान मुंडे, पं.स.माजी उपसभापती विष्णुपंत देशमुख, न.प.चे गटनेते वाल्मिकअण्णा कराड, जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर अघाव, बबनदादा फड, प्रदिप (बबलु) मुंडे, बाळासाहेब किरवले, बाबासाहेब काळे, युवक नेते रामेश्वर मुंडे, ग्रा.भां.औ.वि.केंद्राचे चेअरमन विकास बिडगर, इंटकचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय गुट्टे, न.प.उपनगराध्यक्ष अयुबभाई पठाण, नगरसेवक दिपक देशमुख, तेलगाव सह.साखर कारखान्याचे संचालक भागवतराव देशमुख, सरपंच बाळासाहेब सोनवणे, पं.स.उपसभापती बालाजी (पिंटु) मुंडे, कृ.उ.बा.उपसभापती विजय मुंडे, संचालक माणिकभाऊ फड, राजाभाऊ पौळ, संजय जाधव, मदन गुट्टे, सुरेश मुंडे, शिवाजी शिंदे, भाऊसाहेब नायबळ, पं.स.सदस्य जानिमियॉं कुरेशी, ज्ञानोबा मुंडे, सुदाम शिंदे, वसंत तिडके, सटवाजी फड, मातंग समाजाचे नेते के.डी.उपाडे, माळहिवर्‍याचे सरपंच भानुदास डिघोळे, चंद्रकांत कराड, माधवराव नायबळ, कावळ्याची वाडी सरपंच प्रकाश कावळे, दौनापुर सरपंच बळीरामबापु अघाव, माजी सरपंच महादेव मुळे, नमाजी गडदे, बाळासाहेब घाडगे, नागपिंप्री सरपंच यशवंत भोसले, परचुंडी माजी सरपंच बाबासाहेब रूपनर, लोणी सरपंच विश्वनाथ देवकते, वाघाळा माजी सरपंच अशोक सलगर, वानटाकळी तांडा सरपंच विनायक राठोड, युवा कार्यकर्ते सतिश सलगर, प्रशांत दराडे, दिलीप गायके, माणिकराव सातभाई, डाबी माजी सरपंच कृष्णा मुंडे, ऍड. दत्ता काजगुंडे, ऍड.सतिश काळे, माणिक मुंडे, अरूण मुंडे, संजय मुंडे, नागपिंप्री चेअरमन बालासाहेब मुंडे, छगन देवकते, ह.भ.प.सोपान महाराज काजगुंडे, भागवत मुंडे, रूस्तुमबप्पा सलगर, वामनराव माने, मा.सरपंच भिलेगाव महादेव कडबाने, रा.कॉं. तालुकाध्यक्ष जयदत्त नरवटे, शितलदास आरसुळे, मा.सरपंच करेवाडी राजेभाऊ कावळे, कावळ्याची वाडी उपसरपंच देविदास पवार, ग्रा.पं.सदस्य राहुल मुंडे, सतिश गडदे, युवा नेते अंगद मुंडे, रखमाजी ढाकणे, चेअरमन बालासाहेब मुंडे, सरपंच भरत पोटभरे हे उपस्थित राहणार असुन कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच श्रावण बनसोडे, उपसरपंच मुंजाहरी गडदे, सोसायटीचे चेअरमन प्रल्हाद शिंदे, अभिमन्यु शिंदे, शंकरराव शिंदे, सोपान गडदे, अभिमन्ुय गडदे, अमृत गडदे, भास्कर गडदे, काशीनाथ रूपनर, विष्णु बनसोडे, भागवत रूपनर, नारायण रूपनर, प्रल्हाद शिंदे, सुधीर शिंदे, अरूण शिंदे, देविदास बनसोडे, वैजनाथ रूपनर, मंजाहारी कुंडगर, विठ्ठल गडदे, रघुनाथ गडदे, राम कुंडगर, कारभारी गडदे, भरत गडदे, राजेभाऊ गडदे, कारभारी गडदे, सिद्धराम रूपनर, विष्णु रूपनर, दत्ता गडदे, दत्तात्रय थिटे, अशोक पांचाळ व सर्व ग्रामस्थ बोधेगांव  यांनी केले आहे.