परळीत रविवारी धनंजय मुंडेंच्या विकासकामांचा झंझावात;

0
648
Google search engine
Google search engine
एकाच दिवशी शहराच्या विविध भागात 12 कामांचा शुभारंभ

बीड :नितीन ढाकणे,दिपक गित्ते

परळी दि.14………. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे परळी शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत असुन रविवारी एकाच दिवशी तब्बल 12 कामांचा शहराच्या विविध भागात शुभारंभ होणार आहे. यात शहरातील विविध भागात सामाजिक सभागृहांचा भूमिपुजन सोहळा, संरक्षण भिंत, रस्त्याची कामे, स्मशानभूमी शेडचे कामे, मंदिराचा जीर्णोध्दार, मेळावा आणि नाथ प्रतिष्ठानच्या वतीने शाळा बांधकामाचा शुभारंभ या कामांचा समावेश आहे.


शहरातील शारदानगर भागात असलेल्या समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेकवर्धिनी विद्यालयास नगर पालिकेने अद्यायावत इमारत बांधुन दिली असून, त्याचे शाळेकडे हस्तांतरण सकाळी 09 वाजता श्री.धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील गवळी समाजासाठी ही सामाजिक सभागृह धनंजय मुंडे हे बांधुन देणार असून, त्याचा शुभारंभ सकाळी 10 वाजता, भोई समाज स्मशानभूमी संरक्षण भिंत बांधकाम शुभारंभ सकाळी 10.30 वाजता, दर्गा उमरशहा वली दर्गा कडे जाणार्‍या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ सकाळी 11.00 वाजता, वडार समाज स्मशानभूमीस संरक्षण भिंत बांधकाम व स्मशानभूमी शेडच्या कामाला सुरूवाती सकाळी 11.30 वाजता, मलिकपुरा भागातील रोडच्या कामाचा शुभारंभ दुपारी 12.00 वाजता होणार आहे.
दुपारी 04.00 वाजता शहरातील जैन समाजासाठी नगर पालिकेने दिलेल्या खुल्या जागेवर जैन भवनाच्या कामाचा शुभारंभ होणार असुन दुपारी 05.00 वाजता बाबा रामदेव मंदिराच्या जीर्णोध्दार कामास प्रारंभ ही धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी 06 वाजता भिमनगर येथे भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच अण्णाभाऊ साठे सभागृहाचे भूमीपुजनही होणार आहे. सायंकाळी 07 वाजता बोधेगाव येथे नाथ प्रतिष्ठानच्या वतीने बांधुन देण्यात येणार्‍या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या बांधकामाचा शुभारंभ ही श्री.मुंडे यांच्या हस्ते होणार आहे.
एकाच दिवशी परळी शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास कामांचा शुभारंभ होण्याची ही पहिलीच वेळ असून, त्यामुळे शहरात विकासाचे पर्व निर्माण झाल्याचे चित्र तयार झाले आहे. धनंजय मुंडे यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरात मागील काळात सर्व समाजासाठी सामाजिक सभागृहांचे काम करण्यात आले आहे. नगर पालिकेच्या वतीने भर उन्हाळ्यात ही शहरातील नागरिकांना पाण्याची झळ बसू दिली नाही, विकास कामांच्या या शुभारंभाच्या कार्यक्रमास शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगर पालिकेचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून, नागरिकांनी ही मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे