श्री नरसिंग महाविद्यालयात तरुणींसाठी ‘ फिटनेस वर्कशाॅप ‘ संपन्न आकोटः ता.प्रतिनिधी

0
725
Google search engine
Google search engine

श्री नरसिंग महाविद्यालयात तरुणींसाठी ‘ फिटनेस वर्कशाॅप ‘ संपन्न

आकोटः ता.प्रतिनिधी

स्थानिक श्री नरसिंग कला महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र विभागा अंतर्गत तरुण विद्यार्थिनींना निरामय आरोग्यासाठी व्यायामाचे महत्त्व समजावण्यासाठी दोन दिवसीय ‘ फिटनेस वर्कशाॅप’ चे आयोजन करण्यात आले होते.

या सुदृढता कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अनिल वानखडे, उद्घाटक प्रा. सौ. रेखा रोडे, लक्ष्मिबाई गणगणे कनिष्ठ महाविद्यालय, आकोट, मार्गदर्शक सौ. वैशाली बिटोळे, संचालिका एरोबिक्स सेंटर, त्यांच्या सहकारी नम्रता तल्हारे, शारदा ढेंगे,नुतन इंगळे, तसेच श्री नरसिंग महाविद्यालयाच्या विभाग प्रमुख प्रा. डॉ. बबिता हजारे, प्रा. शारदा सावरकर इत्यादिंची उपस्थिती होती.प्रा. डॉ. हजारेंनी प्रास्ताविक केले. तर उद्घाटक प्रा. सौ. रोडे यांनी आहारासोबत शरिरासाठी व्यायाम आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

अॅरोबिक्स तज्ञ सौ.वैशाली बिटोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘ एरोबिक्स ‘ या व्यायाम प्रकराचे प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थिंनींकडून दोन दिवस सराव करुन घेतला व मनोरंजनाच्या माध्यमातून व्यायाम सहज शक्य असल्याचे पटवून दिले. डॉ. बबीता हजारे यांनी आहार व सुदृढता तसेच योग व मानसिक सुदृढता या बाबत मार्गदर्शकन केले.

दुसऱ्या दिवशी समारोपाला अध्यक्ष म्हणून प्राजक्ता सिंदेकर, सहायक शिक्षिका, श्री नरसिंग विद्यालय, आकोट यांची उपस्थिती लाभली. याप्रसंगी सहभागी विद्यार्थिंनी कु. कल्याणी जाधव, कु. प्रगती वसु यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मुक्ता वसु व स्वाती वसु यांनी केले तर आभार कु. अश्विनी कात्रे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने विद्यार्थिंनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गृह अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे पदाधिकारी यांनी परीश्रम घेतलेत.