*अमरावतीच्या नाट्य रसिकांना मेजवानी* *महावितरण आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धाचे आयोजन* *अमरावती प्रतिनिधी

0
1501

*अमरावतीच्या नाट्य रसिकांना मेजवानी*

*महावितरण आंतरपरिमंडळीय नाट्यस्पर्धाचे आयोजन*

*अमरावती प्रतिनिधी

महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडळीय दोन दिवसाच्या नाट्यस्पर्धा अमरावती येथील ‘ संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक सभागृह ‘ , येथे दि. २० व २१ सप्टेंबर २०१९ रोजी पार पडणार असल्याने अमरावती येथील नाट्य रसिकांना तब्बल पाच नाटकांची मेजवानी मिळणार आहे. या स्पर्धेत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही परिमंडळातर्फ़े नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.

या स्पर्धेचा शुभारंभ शुक्रवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे., कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक दिलीप घुगल हे राहणार आहेत, तर प्रमुख उपस्थिती संचालक (वाणिज्य ) सतीश चव्हाण राहणार आहे. याप्रसंगी मुख्य अभियंता (गुणवत्ता व नियंत्रण नागपुर ) सुहास रंगारी , गोंदीया परिमंडळाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरेकर , अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये , चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरिष गजबे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

या स्पर्धेत शुक्रवार दि. २० संप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता नागपुर परिमंडळातर्फ़े आनंद नाडकर्णी लिखित ‘त्या तीघांची गोष्ट ’ हा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे, दुपारी २ वाजता सलिम शेख यांनी लिहीलेले ‘फतवा ’ हा नाट्यप्रयोग गोंदीया परिमंडळातर्फ़े सादर करण्यात येणार आहे, तर सायंकाळी ६:०० वाजता चंद्रकांत शिंदे लिखित ‘जननी जन्म भुमिश्च ’ हा नाट्यप्रयोग अकोला परिमंडळातर्फ़े सादर करण्यात येईल. शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता चंद्रपुर परिमंडळातर्फ़े प्रशांत दळवी लिखित ‘ ध्यानी मनी ’ हा नाट्यप्रयोग तर दुपारी २:०० वाजता हेमंत एेदलाबादकर यांनी लिहिलेले ‘ एका ब्लॉकची गोष्ट ’ हा नाट्यप्रयोग अमरावती परिमंडळातर्फ़े सादर केला जाणार आहे.

या नाट्यस्पर्धेचे पारितोषिक वितरण शनिवार दि. २१ स्पटेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता भालचंद्र खंडाईत यांच्या अध्यक्षतेत होणा-या या कार्यक्रमाला सर्व कार्यकारी संचालक चंद्रशेखर येरमे (प्रकल्प ), प्रसाद रेशमे ( इन्फ्रा), अरविंद भादिकर (वितरण )आणि प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेत सादर करण्यात येणारे सर्व प्रयोग विनामुल्य आहेत. नाट्यरसिकांनी मोठ्या संख्येने या प्रयोगांना उपस्थित राहून महावितरणच्या कलावंतांना प्रोत्साहित करण्याचे आवाहन नाट्यस्पर्धेच्या स्वागताध्यक्षा तथा अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले आहे.