२२ सप्टेंबर २०१९ रोजी चांदुर बाजार तालुक्यातील फोटो व व्हिडीओ संघातर्फे संगेकर मंगल कार्यालयात मधे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

0
701
Google search engine
Google search engine

२२ सप्टेंबर २०१९ रोजी चांदुर बाजार तालुक्यातील फोटो व व्हिडीओ संघातर्फे संगेकर मंगल कार्यालयात मधे एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यशाळेला मार्गदर्शक श्री सुनिलभाऊ बोर्डे (महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त) व श्री धिरजभाऊ भाकरे (अमरावती) हे मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या उत्कृष्ट फोटोग्राफी अनुभवातून व्याख्यान व प्रात्यक्षिक या कार्यशाळेत ते करून दाखवणार आहेत. छायाचित्रकाराला सन्मानाने जगण्यासाठी शिकवणे व सन्मानाने कमवणे या दोन्ही गोष्टी कशाप्रकारे साध्य कराव्या या करिता ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून त्यामधे स्टुडिओ लाईटिंग, बेसिक कॅमेरा सेटिंग, वेडिंग फोटोग्राफी, फोटोशॉप सिसी, बेसिक टेक्निक हे विषय घेण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजक

नितिन चव्हाण, विजय मोहोड, सुरेंद्र मेहेरे, मनिष शेंडे, राहुल ढवळे, धिरज पाटील, रोशन सातव, वैभव मोहोड, अतुल चौधरी, अमोल टाकरखेडे, अमोल पेठे, शुभम कदम व सर्व चांदुर बाजार फोटो व व्हिडिओ संघातील सर्व सदस्य